आनंद निकेतन कॉलेज च्या कृषिकन्यांनी केले बियाण्यांचे वर्गीकरण

0
523

आनंद निकेतन कॉलेज च्या कृषिकन्यांनी केले बियाण्यांचे वर्गीकरण


वरोरा/प्रतिनिधी : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाद्वारा संलग्न आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील सातव्या सत्रातील विद्यार्थिनींनी ग्रामीण कार्यानुभव विषयाअंतर्गत आनंदवन येथे शास्त्रीय बिजोत्पादनासाठी बियांचे वर्गीकरण केले. शास्त्रीय पद्धतीने निर्माण केलेले सुधारित वाणांचे बियाणे, उत्तम गुणवत्तेचे, शुद्ध, कोणतेही भेसळ नसलेले, कोळरोग मुक्त, ठराविक टक्केवारी इतकी उगवण क्षमता असलेल्या बियाणांची निर्मिती म्हणजे बिजोत्पादन होय. विद्यार्थिनींनी मंत्री हॉल च्या आवारात शेतकऱ्यांना बियाणांचे वर्गीकरण मूलभूत बियाणे, पायाभूत बियाणे, प्रमाणित बियाणे, सत्यवर्धक बियाणे याची माहिती दिली. जेणेकरून बाजारातून बियाणे खरेदी करताना मदत होईल. या प्रात्याक्षिकामध्ये वैभवी गांजरे, मृणली गरपडे, नंदिनी काठोके, जागृती राऊत, तृप्ती काचोळे, रेणुका पाटील या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाकरिता आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस पोतदार, कार्यक्रम प्रभारी डॉ. आर. व्ही. महाजन, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एन. पंचभाई, विषय विशेषज्ञ डॉ. पी. के. आकोटकर,कार्यक्रम अधिकारी डॉ. ए. ए. मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here