जनता ही माझ्यासाठी ईश्वराचे रूप आहे – पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार
राजुरा येथे सेवा केंद्र व भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा
राजुरा : भाजपाचे कार्यकर्ते हे जनतेचे हित समोर ठेवून समाजकार्याचा संकल्प करीत असतात, जनता ही माझ्यासाठी ईश्वराचे रूप असून त्यांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. जनता जसा जो देईल तो स्वीकारण्याची तयारी ठेवली पाहिजे. कार्यकर्त्यांनी लवकर उन्मादात येऊ नये किंवा हताश होऊ नये. राजुरा येथे सुरू करण्यात येणाऱ्या सेवा केंद्रातून गोरगरीब जनतेची सेवा या केंद्राच्या माध्यमातून होणार असून शासकीय योजनांची माहिती व मदत सेवा पुरविली जाणार असल्याचे सांगितले. मूर्ती विमानतळाच्या बाबतीत वाघ अडचणीत येईल म्हणून मी पाठविलेल्या अहवालावर उद्धव ठाकरे यांनी निगेटिव्ह लिहिल्यामुळे आज मूर्ती विमानतळाचा प्रश्न केंद्र सरकारने अडविला आहे. पण मी तो प्रश्न मार्गी लावल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगितले.
यावेळी देवराव भोंगळे यांनी बोलताना सांगितले की, राजुरा तालुक्यातील जनतेसाठी सुधीरभाऊ मुनगंटीवर सेवा केंद्र नेहमी मदतीसाठी सुरू राहील यामध्यामातून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असून असल्याचे सांगितले तर माजी आमदार निमकर यांनी सांगितले की सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून राजुरा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे होत असून यानंतर सुद्धा विकासाची गंगा वाहणार असल्याचे सांगितले.
यावेळी मंचावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार सुदर्शन निमकर, देवराव भोंगळे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश कार्यकारिणीचे आशिष देवतळे, महिला जिल्हा अध्यक्ष अल्काताई आत्राम, चंद्रपूर लोकसभा विस्तारक प्रमोद कडू, नामदेव डाहुले, अमर बोडलावार, अरुण मस्की, नारायण हीवरकर, विवेक बोढे, महेश देवकते, विजयालक्ष्मी डोहे, सुलोचना गुरणुले, अमृता पिलेवाड, सुरेखा श्रिकोंडावार, सुलभा पिपरे, वाघूजी गेडाम, सिद्धार्थ पथाडे, विनायक बोनगिरवार, तालुकाध्यक्ष सुनिल उरकूडे, बबन निकोडे, सुनंदा डोंगे, भाजपा नेते सतीश उपलंचीवर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन केतन जूनघरे तर आभार प्रदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.
इन्फो : राजुरा विधानसभा प्रमुख तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे आयोजित भाजपा जनसंपर्क कार्यालय व सुधिरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रीय ओबीसी मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खुशाल बोंडे, माजी आमदार ऍड. संजय धोटे, त्यांचे बंधू भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, त्यांचे निकटवर्तीय भाजयुमोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन शेंडे, तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, निलेश ताजने, आशिष ताजने यांनी सोहळ्याकडे पाठ फिरविली असून नागरिकांमध्ये याविषयी उलटसुलट जोरदार चर्चा रंगू लागली आहे. बाहेरचा नेता राजुरा शहरात जनसंपर्क कार्यालयाला हजारोच्या संख्येने जनसमुदाय गोळा करण्याचे कसब देवराव भोंगळे यांना करता आले ही बाब भाजपा मध्ये हलचल निर्माण करणारी आहे. भाजपाचा एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच जनसमुदाय एकत्र येत भाजपाचे ताकद दाखवून दिली.