अनंता वायसे हिंगणघाट तालुका प्रतिनिधी
महामानव महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोरील दुर्दशा थांबवा.
महामानव महात्मा फुले यांच्या पुतळ्यास समोरील कंपाउंड वॉल उभी करून सुशोभीकरण करा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी.
हिंगणघाट:-20 ऑक्टोबर 2020
महात्मा फुले सांस्कृतिक भवन येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्या समोरील परिसरात होत असलेल्या दुर्दशेबाबत माजी आमदार प्रा.राजू तिमांडे तसेच नगरसेवक सौरभ तिमांडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले.
ज्योती टॉकीज चौक नंदुरी रोड हिंगणघाट येथील महापुरुष महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह असून तेथे महात्मा फुले यांचा पुतळा आहे व संपूर्ण घाणीचे साम्राज्य पसरले आहे सदर पुतळ्याची अवस्था एकदमच खराब आहे. घाणीच्या विळरण्यात हा पुतळा असुन त्या ठिकाणी लोक स्वाच्छालय व मुतारीसुद्धा करतात.महात्मा फुले सारख्या महापुरुषाची अशी अवस्था असून, या महापुरुषांच्या पुतळ्याच्या दुरवस्थेकडे कोणाचे लक्ष नाही. हे कुठेतरी थांबले पाहिजे या हेतूने आज निवेदन देण्यात आले.
तसेच नगरपरिषदच्या वतीने सदर पुतळ्याच्या परिसरातील पाहणी करून या संदर्भात आवश्यक त्या सोयी जसे की पुतळ्या समोरील परिसर अस्वच्छता असून ते स्वच्छ करण्यात यावे, कंपाउंड वॉल उभी करण्यात यावी व एका ठिकाणी मुत्रीघर तयार करण्यात यावे जेणेकरून लोक पुतळ्याच्या परिसरात मुत्र करण्यासाठी जाणार नाही यासर्व सोई उपलब्ध करून द्याव्या. तसेच महात्मा फुले यांच्या पुतळ्या समोरील कंपाउंड वॉल उभी करून सुशोभीकरण करण्यात यावे त्यामध्ये जनतेच्या आरोग्याचे हित लक्षात घेत ग्रीन जिम तयार करण्यात यावे व लहान मुलांना खेळण्यासाठी झुले लावण्यात यावे तसेच लोक मॉर्निंग वाकला तिथे जाऊ शकेल.
नगरपरिषद क्षेत्रातील ही बाब असल्याने आपण जातीने या प्रकरणाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन दखल घ्यावी व व महात्मा फुले या महापुरुषाच्या पुतळ्याची होत असलेली दूरदर्शन थांबवावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली. निवेदन देतेवेळी गौरव तिमांडे ,राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष हरीश काळे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष सुनील ठाकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शकील अहमद, कार्याध्यक्ष आशिष जाधव, उपाध्यक्ष भास्कर पेंदे, सचिन राऊत इत्यादी उपस्थित होते.