भाजपा अनुसूचित आघाडी तर्फे आमदार भांगडीया यांचा सत्कार
चिमूर/तालुका प्रतिनिधी
येथे बौद्ध धम्मबांधवासाठी उपासक-उपासिका केंद्रासाठी राज्य सरकार कडून पाच कोटी निधी उपलब्ध करून दिला. या बद्दल भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडी चिमूर तालुका च्या वतीने आमदार किर्तीकुमार भांगडिया यांचा रविवारी त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.
चिमूर तालुक्यात बौद्ध धम्माचे अनेक प्रेरणस्थळ आहेत. वर्षभर येथे देशभरातून बौद्ध धम्म बांधव येत असतात. अनेकजण निवासी असतात परिणामी संख्या जास्त असल्याने अनेकांची गैरसौय होत असते, ही बाब लक्षात घेता आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी मतदार संघाच्या मुख्यलाय असलेल्या चिमूर येथे राज्य शासनासाच्या सामाजिक न्याय विभाग मार्फत बौद्ध उपासक-उपसिका केंद्र नुकतंच मंजूर करून घेतलं आहे.
सदरील कार्यच भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती आघाडी चिमूर तालुक्याच्या वतीने स्वागत केले. रविवारला आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या चिमूर येथील निवासस्थानी त्यांचा सदरील कार्याबाबत सत्कार केला. या वेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजू झाडे, अनु.जाती अध्यक्ष जयंत गौरकर, उपाध्यक्ष शैलेंद्र पाटील, लीलाधर बन्सोड, प्रकाश मेश्राम, सतीश वानखेडे, सागर भागवतकर, पराग अंबादे आदी उपस्थित होते.