दिखाऊपणा आणि भपकेबाज मुक्त साक्षगंध

0
556

दिखाऊपणा आणि भपकेबाज मुक्त साक्षगंध


आजकाल छोटे छोटे कोणतेही इव्हेंट असो की लग्न, साक्षगंध असो भपकेबाज पणाने साजरे करण्याची चढाओढ लागलेली दिसते. पाचशे लोकं, जेवायला पाच पंचवीस पक्वान्न, वर वधूची हास्यास्पद एन्ट्री, कागदी फटाके आणि त्याचा कचरा, नवरी नवरदेवाची नाचून दाखविण्याची केविलवाणी धडपड, इलेक्ट्रॉनिक झाडे, धूळ सोडणारे हांडे, डी जे चा कर्कश आवाज, प्रदूषण, केक कापण्याची तऱ्हा असा सगळा ताल असतो. आणि उपस्थित लोकं मूकपणे हा सगळा ताल बघत असतात. आपण काय फक्त जेवायला आलो असे वाटायला लागते. मात्र हिंगणघाट येथे झालेले साक्षगंध या सगळ्याला अपवाद ठरत अभिनंदनास पात्र ठरले आहे. पारंपरिक पद्धतीने पार पडलेल्या या साक्षगंधाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगेबाबा, शेतकरी नेते शरद जोशी यांच्या प्रतिमेची पूजा करून झाली.

येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र झोटिंग यांची कन्या मोनिका व चौधरी परिवार चंद्रपूर यांचे चिरंजीव कौस्तुभ यांचे साक्षगंध कलोडे सभागृहात आयोजित होते. साक्षगंध झालेले दोघेही वर वधू उच्च विद्याविभूषित आहे. हिंदू विधिपूर्वक पार पडलेल्या या साक्षगंधाने नवा संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न होत आहे. वर वधू यांनी प्रत्येकाजवळ जात नमस्कार करून आशीर्वाद घेतले व आलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

कुठेच फोटोग्राफीची धांदल नाही. वर वधूच्या मित्र मैत्रिणींचा सेल्फी नाही. बिस्मिला खान यांच्या सनईच्या मंगलध्वनि ऐकत सन्मानपूर्वक पंगतीचे जेवण करून उपस्थित पाहुणे मंडळींनी शुभेच्छा देत समाधान व्यक्त केले. राजेंद्र झोटिंग व चौधरी परिवाराचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here