आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे मनपातील अधिकारी – कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू
मनपा कर्मचा-यांनी केला आ. जोरगेवार यांचा सत्कार
आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्याने सुरु असलेल्या पाठपूराव्याला अखेर यश आले असून चंद्रपूर महानगर पालिकेतील अधिकारी – कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोग लागु करण्यात आला आहे. त्यामूळे मनपातील कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज येथील कर्मचा-यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्या बदल त्यांच्या सत्कार केला.
चंद्रपूर महानगर पालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा याकरीता आमदार किशोर जोरगेवार हे सुरुवाती पासूनच प्रयत्नशील होते. अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी सातव्या वेतनाचा विषय रेटून धरत सभागृहाचे लक्ष वेधले होते. परिणामी दि २ मार्च 2020 ला विधानभवन मुंबई येथे सदर मागणी संदर्भात वरिष्ठ पातळीच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह नगर विकासचे उपसचिव सतीश मोघे, तत्कालीन मनपा आयुक्त संजय काकडे, तथा संबधीत अधिका-यांची उपस्थिती होती. यावेळी आ. जोरगेवार यांनी चंद्रपूर महानगर पालिकेबाबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर माहिती देत चंद्रपूर महानगर पालिका सुदृढ व संपन्न स्थितीत आहे. चंद्रपूर मनपा अस्थापनेचा खर्च हा 35 टक्केपेक्षा कमी आहे. त्यामूळे येथील कर्मचां-या सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा अशी मागणी लावून धरली होती. यावेळी आ. जोरगेवार यांची ना. एकनाथ शिंदे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली होती. दरम्यान या बैठकीत चंद्रपूर महानगर पालिकेच्या कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग देण्याबाबत सर्व शक्यतांची चाचपणी करण्यात आली होती . तसेच चर्चे अंती येथील कर्मचा-यांना सातवा वेतन आयोगाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सदर कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या दिशेने सरकारने प्रयत्न सुरु केले होते.
परिणामी आता हा विषय मार्गी लागला आहे. चंद्रपूर येथील मनपा कर्मचा-यांना आता सातव्या वेतनाचा लाभ मिळणार असल्याने कर्मचा-यांच्या वेतनात जवळपास 4 ते 5 हजारांनी तर अधिका-यांच्या वेतनात 7 ते 8 हजारांची वेतनवाढ होणार आहे. याचा परिणाम त्यांच्या भविष्य उदरनिर्वाह निधीवरही होणार असून त्यात वाढ होणार आहे. मागणीचा सातत्याने पाठवूरावा करण्याच्या आ. जोरगेवार यांच्या कार्यप्रणालीमुळे अनेक वर्षापासुन प्रलंबीत असलेला प्रश्न मार्गी लागला आहे. दरम्यान सातवा वेतन आयोग लागू करुन दिल्या बदल आज मंगळवारी महानगर पालिकेतील कर्मचा-यांनी आ. जोरगेवार यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.
यावेळी तुकड्यादास डुमरे, संजय टिकले, मेघशाम दैवलकर, भूषण ठकरे, सुभाष ठोंबरे, नामदेव राउत, अनिल बनकर, श्रिराम नागापूरे, नानाजी हादवे, सुशिल तळवेकर. आदिंची उपस्थिती होती. यावेळी मनपा कर्मचा-यांनी आ. जोरगेवार यांचे आभार मानत पूष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला.