घुग्घुस शहरासाठी अत्याधुनिक रुग्णवाहीका व शववाहिका मिळणार
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मागणीला यश
घुग्घुस शहरासाठी एक अत्याधुनिक रुग्णवाहीका व शववाहीका मिळवून देण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केलेल्या मागणीला व सततच्या पाठपुराव्याला या यश आले आहे.
घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीतर्फे शहराला एक अत्याधुनिक रुग्णवाहीका व शववाहिका मिळण्यासाठी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी कंपनी व्यवस्थापनाला निवेदनातून मागणी केली होती व सतत पाठपुरावा सुरू होता.
घुग्घुस हे औद्योगिक शहर असून शहराची लोकसंख्या ५० हजारांच्या जवळपास आहे. परिसरात वेकोलिच्या अनेक कोळसा खाणी आहे तसेच सिमेंट उद्योग व लॉयड्स उद्योग आहे. त्यामुळे घुग्घुस परिसरात जडवाहन, चारचाकी व दुचाकी वाहनांची वाहतुक मोठ्या प्रमाणात सुरु असते. रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात घडत असतात.
प्रा. आ. केंद्राला जवळपास १५ गावे जोडलेले आहे. ग्रामीण भागातील रुग्ण उपचारासाठी घुग्घुस शहरात येत असतात. गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना चंद्रपूर येथे हलविण्यात येते. त्यामुळे घुग्घुस शहराला एक अत्याधुनिक रुग्णवाहिकेची आवश्यकता असल्याने नगर परिषदेला देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली होती.
घुग्घुस शहरात एकही शववाहिका नसल्यामुळे शववाहिकेची अत्यंत आवश्यकता होती. लॉईड मेटलने शववाहिका उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देवराव भोंगळे यांनी केली होती.
या दोन्ही मागण्यांच्या अनुषंगाने लवकरच लॉयड्स मेटल्स कंपनीतर्फे नगर परिषदेला एक अत्याधुनिक रुग्णवाहीका व शववाहीका देण्यात येणार आले.
घुग्घुस शहरासाठी एक अत्याधुनिक रुग्णवाहीका व शववाहिका मिळणार असल्याने शहरवासियांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांचे आभार व्यक्त केले आहे.