ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन
क्रांतिकारी बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरित केले- विवेक बोढे
घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे शुक्रवार, ९ जून रोजी सकाळी आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, बिरसा मुंडा एक क्रांतिकारी होते ते आदिवासी समाजाचे वीर नायक होते. बिरसा मुंडा यांनी इंग्रज सरकारविरुद्ध भारताच्या स्वातंत्र्यासाठी आंदोलने केली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांनी मोठे स्थान प्राप्त केले. बिरसा मुंडा यांनी अनेक जाती जमातीच्या समूहाला एकत्रित करून इंग्रजांविरुद्ध लढण्यास प्रेरित केले.
यावेळी मंदेश्वर पेंदोर, शरद गेडाम, सिनू आडे, मायकल कल्लेपेल्ली, सुमित धोटे, सुनंदा लिहीतकर, निशा उरकुडे, प्रीती धोटे, शीतल कामतवार, भारती परते, नेहा कुम्मरवार, खुशबू मेश्राम, स्वाती गंगाधरे, विष्णू खुटेमाटे, आदित्य आस्वले उपस्थित होते.