लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगातर्फे जागतिक पर्यावरण दिन समारंभ

0
635

लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगातर्फे जागतिक पर्यावरण दिन समारंभ

दि.५ जुन २०२३ सोमवार सकाळ रोजी लाइट्स मेटल एण्ड एनर्जी लिमिटेड उद्योगात सर्व कामगार कर्मचारी एकत्रित येऊन दोन्ही हात जोडून पर्यावरण दिनाचा प्रार्थना, शपथ घेण्यात आले.तसेच पर्यावरण दिनाचा बरेच कर्मचाराने स्लोगन काढण्यात आले व कंपनीचे सुरक्षा अधिकारी, वरिष्ठ प्रबंधकांनी कंपनीतील कर्मचारांना बक्षिस वितरण करण्यात आले.
प्लास्टिक प्रदूषणावर मात करा
पर्यावरण दिनानिमित्ताने कंपनीचा परिसरातील वृक्षारोपण करण्यात आले. कंपनीचे प्रमुख हेड श्री.संजयकुमार सर यांनी आपल्या मनोगतात कर्मचाऱ्याला सांगितले कि पर्यावरण दिन लोकांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रोत्साहित करतो. हा दिवस आपल्याला पर्यावरणाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची आठवण करून देऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास प्रवृत्त करतो. वृक्षतोड थांबवणे आणि वृक्षारोपण करणे ही पर्यावरणाच्या हितासाठी केलेली सर्वोत्तम कृती आहे. पर्यावरणाशी सुसंगतता लक्षात घेऊन, एकेरी वापराचे प्लास्टिक न वापरता पर्यावरणपूरक अक्षय उत्पादने वापरण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या सर्वांचे जीवन केवळ झाडांमुळेच शक्य आहे कारण आपल्याला जगण्यासाठी ऑक्सिजन झाडातूनच मिळतो. विविध प्रकारच्या प्रदूषणामुळे होणाऱ्या जीवघेण्या आजारांचे निदान झाडांच्या उपस्थितीनेच शक्य आहे. त्यामुळे जीवनात तसेच पर्यावरणातही आपण वृक्षांचे महत्त्व स्वीकारून पर्यावरणपूरक कार्य केले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here