राष्ट्रसंतांचा विचार घेऊन समाजसेवेसाठी तत्पर असणारे नेते सुभाषभाऊ कासनगोट्टुवार
चंद्रपूरातील प्रतिष्ठीत व सर्वदूर परिचीत व्यक्तीमत्व डॉ.स्व.सच्चिदानंदजी मुनगंटीवार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त दि.३जुन रोजी स्थानिक तुकुम प्रभागात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने प्रेरित श्री.गुरूदेव सेवा मंडळ व माता श्री कन्यका सेवा संस्था चंद्रपूर च्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय नामदार श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागाचे तडफदार माजी नगरसेवक सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांनी समाजातील सर्व घटकांसाठी २५०० नागरिकांना नेत्र चिकित्सा , चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दि.३ जून ला सकाळी १० वाजता ज्येष्ठ नागरिक संघ सभागृह निर्माण नगर येथे कार्यक्रमाचे भव्य स्वरूपात आयोजन केले.
आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार डॉ. रामदासजी आंबटकर तर अध्यक्षस्थानी श्री.गुरुकुंज आश्रमाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे राहणार असुन सर्वश्री डॉ.तन्मय बिडवाई(क्ष किरण तज्ञ मुंबई), सुबोध दादा(संचालक अड्याळ टेकडी), संदिप पोशट्टीवार( संचालक नरकेसरी प्रकाशन), वसंतराव थोटे(अध्यक्ष हेडगेवार जन्मशताब्दी),मिलींद कोतपल्लीवार(अध्यक्ष कन्यका मंदिर),जयंत बोनगिरवार( कन्यका नागरी बॅंक), महेश कोंडावार(पोलिस निरीक्षक स्थान.गुन्हे शाखा), डॉ.मंगेश गुलवाडे( संचालक महाराष्ट्र आय.एम.ए.) आदी प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत शिबिर पार पडणार आहे.
स्व.डाॅ. सच्चिदानंदजी यांनी नेहमीच दिनदलित,शोषित, पिडीतांच्या सेवेचे उदिष्ट डोळ्यासमोर ठेऊनच समाजकार्यात स्वतः:ला झोकुन दिले होते. अंध,अपंग व निराधारांची सेवा हिच ईश्वर सेवा मानून आश्रय संस्थेच्या माध्यमातून निराधार बालकांना आधार देण्यासोबतच त्यांचे पालनपोषण,शिक्षण याकडे लक्ष देत असायचे. तेच कार्य संस्थेकडून नित्यनेमाने सुरू आहे.
सबके लिये खुला है, मंदीर यह हमारा या वंदनीय राष्ट्रसंतांच्या भजनातील शब्द रचनेप्रमाने सर्व जाती,पंथ व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन माजी नगरसेवक श्री. सुभाषभाऊ कासनगोट्टूवार हे अविरतपणे समाजकार्य करीत जिल्ह्याचे पालकमंत्री लोकनेते श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या आशिर्वादाने राजकारणात सक्रिय सहभागी राहुन जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी नेहमीच धावून जातात.हे सर्वश्रुतच आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यातील २६ ते २८ अशा तीन दिवसीय राज्यस्तरीय भव्य भजन स्पर्धेचे आयोजन करून जिल्ह्यातील गुरूदेव प्रेमी जनांना एकत्र आणण्याचा सुभाष भाऊंचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद होता. प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यात सुभाषभाऊंच्या खांद्याला खांदा लावुन विजयराव चिताडे , बबनराव अनमुलवार हे दोघेही तनमनधनाने सोबत असतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा…