उदया मंगळवारी होणार भव्य आरोग्य शिबिराचे उद्घाटन
आमदार किशोर जोरगेवार यांनी केली व्यवस्थेची पाहणी, उत्तम व्यवस्था करण्याच्या सूचना
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून महानगर पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १० भव्य आरोग्य शिबिराला उद्या तुकूम येथील पंडित दिनदयाल शाळा येथून सुरवात होणार असुन आज येथील व्यवस्थेची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली असून येथे येणा-या नागरिकांची उत्तम व्यवस्था करण्याच्या सुचना केल्या आहे. यावेळी मनपा उपायुक्त अशोक गराटे, मनपा आरोग्य अधिकारी विनीता गर्गेलवार, डॉ. अतुल चटकी, डॉ. नेहा उत्तरवार, डॉ. नरेंद्र जनबंधू आदींची उपस्थिती होती.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या पूढाकारातून चंद्रपूर शहर महानगरपालिका, इंडियन मेडिकल असोसिएशन, जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, व दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आर्चाय विनोबा भावे, ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे, यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध १० ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार असुन तुकुम येथील पंडित दिनदयाल उपाध्याय शाळा येथे पहिल्या शिबिराचे आयोजन केल्या जाणार आहे. ३० मे ला या शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
दरम्यान आज सोमवारी पंडित दिनदयाल उपाध्याय शाळा येथील व्यवस्थेची आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. शिबिराला येणा-या नागरिकांसाठी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, त्यांना बसण्याची उत्तम व्यवस्था येथे असावी, स्वच्छता ठेवण्यात यावी, नागरिकांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी विशेष व्यक्तीची नेमणूक करण्यात यावी, येणा-या रुग्णांचे पुर्ण समाधान होईल असे नियोजन येथे करावे अशा सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा अधिका-यांना केल्या आहे.
उपलब्ध वैद्यकीय सुविधा ब्लड प्रेशर, ई.सी.जी, मेमोग्राफी, ब्लड शुगर, सर्व प्रकारच्या रक्त चाचण्या, मोफत औषधी व तपासणी, बाह्यरुग्ण सेवा, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण, सिकल सेल चाचणी..
उपस्थित डाॅक्टर जनरल फिजीशियन, बालरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, स्त्री रोग व प्रसुती रोग तज्ञ, नाक, कान, घसा तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, अस्थि रोग तज्ञ, मानोसपचार तज्ञ, दंत रोग तज्ञ.