दर रविवारला जड वाहतूक बंद करा – युवा शिवसेनाची मागणी

0
662

दर रविवारला जड वाहतूक बंद करा – युवा शिवसेनाची मागणी


घुग्घुस येथे दर रविवारला आठवडी बाजार भरते. तसेच घुग्घुस शहरातील व परिसरातील नागरिकाची बाजारात भाजी-पाला व आवश्यक खरेदी करीता गर्दी होते. दुपारी तीन ते रात्री आठ वाजेपर्यंत बाजार असतो.
यामुळे सातत्याने सुरू असलेल्या वाहतुकीमुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. बाजारात ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षे करिता दुपारनंतर ये-जा जड वाहतूक बंद ठेवण्यात यावी अशी मागणी घुग्घुस शिवसेना, युवासेना द्वारे निवेदनातून एसीसी कंपनी, नगरपरिषद कार्यालय व पोलीस ठाणे घुग्घुस यांना देण्यात आले.

यावेळी निवेदन देताना शिवसेना शहर प्रमुख चेतन (बंटी) घोरपडे, युवासेना शहर प्रमुख इंजि. चेतन बोबडे, शिवसेना उपशहर प्रमूख सतीश गोहोकर, शिवसेना उपशहर प्रमूख अनुप कोंगरे, शिवसेना प्रभाग प्रमूख किशोर चौधरी, युवसौनिक रेहांत शेंडे व गोलू उईके आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here