दामोदर सारडा यांची विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेच्या अध्यक्ष पदी निवड
चंद्रपुर माहेश्वरी समाजाच्या वतीने सत्कार, संघटनेत पहिल्यांदा चंद्रपुरच्या सुपुत्राला अध्यक्षपदाचा मान
विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेची नवी कार्यकारणी घोषीत झाली असुन चंद्रपूरचे सुपुत्र सि. ए दामोदर सारडा यांची अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. तर उमेश चांडक यांची विदर्भ प्रादेशीक कार्यसमीती सदस्य म्हणुन निवड करण्यात आली आहे. निवड झाल्याबद्दल चंद्रपूर माहेश्वरी समाजाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
माहेश्वरी समाज सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करित आहे. कोरोना काळात त्यांनी केलेली कार्य कौतुकास्पद आहे. हे कार्य आणखी गतीशील करण्यासाठी विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटनेची नवी कार्यकारणी घोषीत करण्यात आली आहे. दर तिन वर्षाने मतदान प्रक्रियेने संघनेच्या अध्यक्षांच्या निवड केल्या जाते. दरम्यान काल रविवारी नागपूर येथे सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली यात चंद्रपूरचे सुपूत्र सि.ए दामोदर सारडा यांची अध्यक्ष पदाकरिता बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दामोदर सारडा यांच्या रुपाने संघटनेला पहिल्यांदा चंद्रपूर जिल्ह्याचा अध्यक्ष लाभला आहे. तर यावेळी उमेश चांडक यांची विदर्भ प्रादेशीक कार्यसमीती सदस्य म्हणुन निवड करण्यात आली आहे.
यापूर्वी सि.ए दामोदर सारडा यांनी इन्कम टॅक्स आर असोसिएशनच्या अध्यक्ष पदासह चंद्रपूर सिए असोशिएशन संयोजक, लायन्स क्लब ऑफ महाकाली चे अध्यक्ष पद, जे.सी आय चंद्रपूरचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष या पदांचा पदभार यशस्वीरित्या सांभाळला आहे. तर सध्या माहेश्वरी सेवा समिती अध्यक्ष ते श्री. आनंद नागरी सह. बॅंक चे संचालक, निराधार बालक संगोपन केंद्राचे अध्यक्ष, शिव मोक्ष धामचे उपाध्यक्ष, श्री साईबाबा मंदिर, श्री लक्ष्मीनारायण मंदिरचे ट्रस्टी, यासह इतर पदांवर कार्यरत आहे.
नागपूर येथे पार पडलेल्या निवडणूक प्रक्रिये दरम्यान अखिल भारतीय माहेश्वरी संघटनचे सभापती श्याम सुंदर सोनी, अखिल भारतीय माहेश्वरी संघटनचे निवडणूक अधिकार अॅड. विजय चांडक, अखिल भारतीय माहेश्वरी मध्यांचलचे निवडणूक अधिकारी सज्जन मोहता, विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटने निवडणूक अधिकारी मधुसुदन सारडा, विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संघटने अध्यक्ष अॅड. रमेशचंद्र चांडक, सचिव डाॅ. रमन हेडा, रमेश मंत्री, शिवनारायन सारडा यांच्यासह विदर्भातील पदाधिका-यांची उपस्थिती होती. त्यांची अध्यक्ष पदी निवड झाल्याबदल चंद्रपूर माहेश्वरी समाजाच्या वतीने त्यांचे चंद्रपूर येथे आगमन होताच त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी डाॅ. सुशील मुंदडा, हनुमान बजाज, प्रभाकर मंत्री, राजेश काकानी, श्रवन मंत्री, मनिष सो बजाज, निशांत भट्टड, सुरेश राठी, संदीप बजाज, मनोज जाजू, मनिष बजाज, गोविंद राठी, प्रविण सारडा, ललीत कासट, माहेश्वरी युवक मंडळ सचिव श्रीकांत भट्टड आदींची उपस्थिती होती. संपूर्ण माहेश्वरी समाजाला एकत्रीत करण्याचे काम आम्ही करणार असुन समाजाच्या वतीने समाज उपयोगी उपक्रम राबविण्यावर आमचा अधिक भर असणार आहे. समाजाच्या समस्यासोडविण्यासाठीही आमचे प्रयत्न असणार असल्याचे नवनियुक्त अध्यक्ष सिए दामोदर सारडा यांनी म्हटले आहे.