घुग्घुस शहरात उध्दव बाळासाहेब ठाकरे युवासेना कार्यालयाचे उद्घाटन

0
862

घुग्घुस शहरात उध्दव बाळासाहेब ठाकरे युवासेना कार्यालयाचे उद्घाटन

१ मे महाराष्ट्र दिन या दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर जिल्ह्य युवासेना घुग्घुस शहर ‘युवासेना कार्यालय’ चे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष युवासेना विभागीय सचिव तथा सिनेट सदस्य गोंडवाना विद्यापीठ प्रा निलेश बेलखेडे ,शिवसेना वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष स्वप्निल काशीकर, संघटिका उज्वला नलगे, युवासेना जिल्हा समन्वयक विनय धोबे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पन करण्यात आले. सदर कार्यालय हे युवासेना घुग्घुस शहर प्रमुख इंजि. चेतन बोबडे यांच्या नेतृत्वात वराटे हाॅस्पीटल जवळ, श्रीराम वार्ड नंबर २ येथे सुरू केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समोर विचार मांडतांना युवासेना चे विभागीय सचिव प्रा.निलेश बेलखेडे यांनी हे कार्यालय युवासेना च्या मार्फत विविध शासकीय योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी, विद्यार्थी -युवकांच्या मदतीसाठीचे केंद्र म्हणून कार्यरीत राहावे व या माध्यमातून युवासेना घुग्घुस जनसेवेचे कार्य करीत राहणार असे प्रतिपादन केले.

यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल काशीकर यांनी चेतन बोबडे यांना शुभेच्छा देतांना जनसामान्यांपर्यंत पोहोचून घुग्घुस वासीयांना मदतीचा हाथ आपल्या मार्फत पोहोचत राहावा अशी इच्छा व्यक्त करीत कधीही आम्ही तुमच्या सहकार्यासाठी सदैव तयार राहील अशी भावना व्यक्त केली.

यावेळी इतर मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करतांना चेतन बोबडे यांना भावी वाटचालीचीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना घुग्घुस शहर प्रमुख चेतन (बंटी) घोरपडे, शिवसेना तालुका समन्वयक विकास विरूटकरजी, उपजिल्हाप्रमुख हेमराज बावणे, सतीश गोहोकार, युवासेनाचे प्रफुल चावरे, तालुका समन्वयक युवासेना ज्ञानेश्वर लोनगाडगे, युवासेना चंद्रपूर उपशहर प्रमुख सार्थक शिर्के, घुग्घुस चे प्रभाग प्रमुख किशोर चौधरी, शिवस्वराज्य कामगार सेनाचे नेते बबलू रामटेके, मधू कुक्का, अश्फाक भाई, रघुनाथ धोंगडेजी, सुश्मित गोरकार, ,पंकज राजपूत, रेहान शेंडे, हितेन बेहेरे, सोहेल शेख, प्रिन्स जाॅन, जयंत निखाडे, अजय राय, अमर कापटे, अजय गौतम यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here