क्रांतीनगरी चिमूरात किर्तीकुमार ठरला किंगमेकर
भाजप ची सहकार क्षेत्रात उडी, महाविकास आघाडीची वज्रमुठ तुटली
आशिष गजभिये
चिमूर
तालुक्यात सद्या सहकार क्षेत्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पनं बाजार समितीच्या निवणुकांची रणधुमाळी सुरू होती.सन २०२३ते २०२८ करिता मतदान प्रक्रिया पार पडली,या करिता १४६० मतदार होते १३७७ मतदारांनी हक्क बजावला.शनिवारला मतपेढी फुटली यात भाजप ने चिमुरात एकहाती सत्ता प्राप्त केली.
या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वज्र्यमुठी मध्ये फूट पडली.स्थानिक आमदार किर्तीकुमार भांगडिया व काँग्रेस सहकार नेते संजय डोंगरे यांनी भाजप शी हातमिळवणी करून आपली कमाल दाखवली.प्रथमच क्रांतीनगरीत भाजप सहकार क्षेत्रात दाखल झाली आहे.
या निवडणुकीत नंदकुमार गावंडे,प्रशांत गुरपुढे,घनश्याम डुकरे,कैलास धानोरे,दशरथ नन्नावरे,रवींद्र पंधरे,प्रकाश पोहनकर, गीता कारमेंगे,रेखा मालोदे, प्रशांत चिडे,संदीप पिसे,दिनकर सीनगारे,मंगेश धाडसे,भास्कर सावसाकडे,मनोहर पिसे,अनिल वनमाळी,भरत बंडे हे संचालक पदी निवडून आले आहेत. विजयी उमेदवार यांची चिमूर मध्ये वाजत गाजत भव्य मिरवणूक निघाली.विजयाचा जल्लोष करण्यात आला.
सभापती पदी महिला
तालुक्यातील मोठे सहकार नेते अशी ओळख असलेल्या बकाराम मालोदे यांच्या पत्नी रेखा मालोदे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या.मोलोदे यांचं कार्य बघता पारडं त्यांच्या कडे नक्कीच झुकणार अशी चर्चा तालुक्यात सुरू आहे.या मुळे या वेळात संभाव्य महिला सभापती असण्याची शक्यता आहे.
हा विजय सर्व जनतेचा असून शेतकऱ्यांच हित करण्यासाठी चा आहे.सर्व मतदार यांनी शेतकरी सहकार विकास आघाडी च्या उमेदवार यांना मताधिक्य दिल,त्या बद्दल सर्व मतदार यांचे आभार! – किर्तीकुमार भांगडिया(आमदार,चिमूर)