राजुरा व कोरपना कृषी उत्पन्न बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा
दिनांक : २९ एप्रिल २०२३
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांचे नेतृत्वात राजुरा व कोरपना तालुक्यात नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत दोन्ही बाजार समितीवर काँग्रेसनी विजय मिळवला. राजुरा आणि कोरपना या दोन्ही बाजार समितीवर काँग्रेसचा एक हाती झेंडा रोवला गेला.
राजुरा व कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समितीवर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस विजयी झाल्याने विरोधकांना चांगलीच चपराक मिळाली आहे. ज्यामुळे उद्या होणाऱ्या गोंडपिपरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवरील निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे नेतृत्वात झालेल्या राजुरा व कोरपणा बाजार समितीवरील विजयामुळे गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सुद्धा काँग्रेसच आपला विजयी गड राखेल, अशा आशा पल्लवीत झालेल्या आहेत.
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे ११ व भाजपा ४ तर शेतकरी संघटना ३ उमेदवार विजयी झाले. आणि कोरपणा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसचे १३ व शेतकरी संघटना गोंडवाना युती चे ५ तर भाजपाला भोपळा मिळाला.
अशाप्रकारे काँग्रेसनी विजय संपादन करत राजुरा व कोरपना बाजार समितीवर काँग्रेसने आपला गड कायम राखला व विरोधकांना चपराक दिली.