भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी

0
545

भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती साजरी

घुग्घुस – दि. 14 एप्रिल 2023 रोजी भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस च्या वतीने प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती पंचशील बौद्ध विहार समता वाचनालय घुग्घुस येथे साजरी करण्यात आली.

भारतीय बौद्ध महसभा जिल्हाध्यक्ष नेताजी भरणे, महिला जिल्हा उपाध्यक्षा आयुनी. सुजाताताई लाटकर मॅडम, केंद्रीय शिक्षका आयुनी. सपनाताई कुंभारे मॅडम केंद्रीय शिक्षका आयुनी. कविताताई चांदेकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी पंचशील बौद्ध विहार इथुन लेझीम पथक द्वारे रॅली ही नगर परिषद घुग्घुस येथे प. पु. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक बुद्ध वंदना घेऊन लेझीम पथक द्वारे ही रॅली पंचशील बौद्ध विहार परत येऊन पंचशील बौद्ध विहार येथे महामानव तथागत भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, प. पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विहार वरती पंचशील ध्वज राजु घागरगुंडे याच्या हस्ते फहरविण्यात आला तर लेझीम पथक द्वारे पंचशील ध्वज फडकवून प. पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोष करुन सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. या कार्यक्रमात प्रमुख मंचावर उपस्थित म्हणून अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव, हेमंतभाऊ आनंदराव पाझारे, कोषाध्यक्ष विहार बांधकाम, चंद्रगुप्त घागरगुंडे कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महसभा, मायाताई सांड्रावार उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस जनार्दनजी जिवणे, सामाजिक कार्यकर्ते, राजु घागरगुंडे, माधव वनकर सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुनी. रमाबाई सातारडे यांनी केले.

कार्यक्रमाचे देखरेख भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस कार्याध्यक्ष चंद्रगुप्त घागरगुंडे यांनी योग्य रित्या केले होते. सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव अध्यक्ष भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस हेमंत आनंदराव पाझारे माधव वनकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सोनल पाझारे यांनी केले.
तसेच यशोधरा मस्के यांनी प. पु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सात फुटाची प्रतिमा जय भीम युवा मंचला भेट दिली व जय भीम युवा मंच यांनी ती बाबासाहेबांची प्रतिमा भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा पंचशील बौद्ध विहार यांना भेट देण्यात आली.

सायंकाळी घुग्घुस येथील सर्व बौद्ध विहार येथील रॅली महाप्रज्ञा बौद्ध विहार इंदिरा नगर, सारिपुत्त बुध्द विहार गांधी नगर, तक्षशिला जनजागृत महिला मंडळ बैरमबाबा नगर, गौतमी बौद्ध विहार केमिकल वार्ड, हि भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस पंचशील बौद्ध विहार येथे एकत्रित येऊन हि रॅली गांधी चौक इथुन प्रस्थान करण्यात आली गांधी चौक येथे आम्रपाली बौद्ध विहार, नवयुवक बौद्ध मंडळ, कॉलरी नं. 2 हि समाविष्ट होऊन हजारो चा संख्येने प. पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जय घोष करत हि रॅली बँक ऑफ़ इंडिया, नवबौद्ध स्मारक समिती तथा बहुउद्देशीय संस्था इथे समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळेस भारतीय बौद्ध महसभा नगर शाखा घुग्घुस अध्यक्ष सुरेशभाऊ मल्हारी पाईकराव, नवबौद्ध स्मारक समिती अध्यक्ष रामचंद्र चंदनखेडे, आम्रपाली बौद्ध विहार अध्यक्ष, बंडू रामटेके, तक्षशिला जनजागृत महिला मंडळ अध्यक्ष, सरोजताई पाझारे, नवयुवक बौद्ध मंडळ, श्याम कुमरवार, महाप्रज्ञा बौद्ध विहार अध्यक्ष वैशालीताई जिवणे, सारिपुत्त बुध्द विहार अध्यक्ष अल्काताई चुनारकर गौतमी बौद्ध विहार सामाजिक कार्यकर्ते देवरावजी भोंगळे, व घुग्घुस समस्त बौद्ध बांधव उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here