वणीच्या स्थानिक कलावंतांनी सादर केली हास्यजत्रा
जैताई नवरात्रातील धमाल विनोदी कार्यक्रम
वणी:- येथील जैताई देवस्थान मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवात उद्बोधक तथा विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी वणीकरासाठी सुरू आहे. या शृखलेत सागर झेप बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दि. 28 मार्चला येथील स्थानिक कलावंतांनी हास्यजत्रा हा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून हास्याचा फुलोरा फुलविण्यात यशस्वी झाले. वणीकरांनी या कलावंतांना भरभरून दाद दिली.
या सर्व कलावंतांनी सुरुवातीला नांदी सादर करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संदीप उरकुडे, सागर मुने यांनी ससा व बर्फाची फॅक्टरी सादर करून सगळ्यांना हसवले. सासू माझी ढासू यात सुनंदा गुहे, सोनल टिकले या सासासुनेचे भांडण होते. त्यात निकुंज सातपुते याची गोची होते.
महिलांच्या टूर प्लानिग साठी तृप्ती उंबरकर, श्रुती उपाध्ये, राधा वैद्य, तारा कुळकर्णी, कविता सातपुते, प्रिया बिवलकर, या टूर प्लानिग साठी येऊन विचित्र प्रश्न विचारून टूर मॅनेजर सागर मुने व असिस्टंट वेदांती उंबरकर यांच्या प्रहसनातून धमाल विनोद या कलावंतांनी सादर केला. कांदे पोहे या प्रहसनात अशोक सोनटक्के, शैलेश अडपवार, प्रिया कोणप्रतिवार, प्राची चंदेलकर, सीमा सोनटक्के, सागर मुने यांनी धमाल विनोद सादर केला. यातून शेतकरी नवरा उत्तम असतो असा संदेश देण्यात आला.
सागर मुने, प्रवीण सातपुते, करिष्मा नवले, निखिल वाघाडे, यांच्या पप्पा या प्रहसनामध्ये मध्ये मुलीच्या आधीच झालेल्या तीन लग्नच्या घोळातून
सगळा रसिक वर्ग हसून हसून लोट पोट होतो. व्हराड चाललं बँकेला या प्रहसनात बँकेचा मॅनेजर पाणी पुरी विकणाऱ्या व त्याच्या बायकांना कर्ज देत नाही व त्याचे महिन्याचे उत्पन्न पाहून तो सुद्धा पाणी पुरी विकण्याचा काम सुरू करतो. यातील विनोदी अभिनयाद्वारे सीमा सोनटक्के, अशोक सोनटक्के, उमाकांत मसे, मीना वानखेडे यांनी प्रहसन सादर केले. या कार्यक्रमात स्नेहलता चुंबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर एकपात्री प्रयोग सादर केला. तसेच पोटाची खळगी भरायला काय काय करावे लागते हे प्रकाश खोब्रागडे यांनी आपल्या एकपात्री प्रयोगातून दाखवले. प्रसिद्ध मिमिक्री कलावंत आकाश महादूले यांनी विविध पद्धतीने रसिकांचे मनोरंजन केले.
ध्वनी व्यवस्था संदीप आस्वले यांनी सांभाळली, पार्श्वसंगीत अभिलाष राजूरकर, अक्षय करसे, राधा सोनटक्के यांनी दिले.