युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांची महाराष्ट्रातून निवड
राजुरा (ता.प्र.) : चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांची ‘इंडियन स्कूल ऑफ डेमक्रेसी’ कार्यक्रमा करिता महाराष्ट्रातून निवड करण्यात आली. इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी या दिल्ली येथील नामवंत गैरे-सरकरकी संस्थेने (NGO) त्यांची ही निवड केली असून या संस्थेचे ” द गुड पॉलिटिशन ” या कार्यक्रमा अंतर्गत त्यांना संधी देण्यात येत आहे. इंडियन स्कूल ऑफ डेमोक्रेसी या कार्यक्रमा करिता भारतातील प्रत्येक राज्यातून ४-५ मुला/मुलींना संधी देण्यात येते. इथली निवड प्रक्रिया सुद्धा अतिशय लक्षपूर्वक घेतली जाते, इच्छूक उमेदवाराला ४-५ प्रकारच्या वेगवेगळ्या फेऱ्यांचा माध्यमातून स्वतःला करावे लागते. नंतर योग्य उमेदवाराची निवड होते.
महाराष्ट्रातून चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांची निवड करण्यात आली आहे. इंडियन स्कूल ऑफ डेमक्रेसी ही एक पक्षविरहित संस्था आहे. जी आशावादी, निश्चयी, महत्वाकांक्षी अशा तळागाळातील राजकीय नेत्यांसाठी कार्यक्रम आयोजित करते. सर्वोदय साध्य करण्यासाठी नैतिक धैर्य आणि कल्पकतेने तत्त्वनिष्ठ नेत्यांचे पालनपोषण करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. या संस्थेत भारतातून प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या पक्षातील तरूण येथे प्रशिक्षणासाठी निवडले जातात.
शंतनू धोटे एक सुशिक्षित, मेहनती, आशावादी व्यक्तिमत्व असून तरूण वर्गाला सोबत घेऊन विधायक कार्यात व्यस्त असतात. शंतनु धोटे यांची ही निवड म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यासाठी भूषणावह बाब आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.