विरूर पोलीस स्टेशन व लाठी पोलीस स्टेशन अंतर्गत आर्वी पुलावर नाकेबंदीत 20 पेटी देशी दारू पकडण्यात पोलिसांना यश
विरूर पोलीस स्टेशन व लाठी पोलीस स्टेशन अंतर्गत आर्वी जवळील वर्धा नदी पुलावर नाकेबंदीत एका कार मध्ये 20 पेटी देशी दारू पकडण्यात पोलिसांना आज अखेर यश आले.
कार मधील चालक पळून गेले तर दारु सह कार असा एकूण 150000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 17 मार्च 2023 रोजी पोलीस स्टेशन विरूर व पोलीस स्टेशन लाठी संयुक्तरित्या आर्वी पुलाजवळ नाकाबंदी केली असता गोपनीय माहिती वरुन नाकेबंदी दरम्यान एक कार येत असताना दिसली व त्या मधील इसम पोलीसांना पाहून पळून गेले.
पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्या कार मध्ये 20 खर्ड्याचे बाॅक्स मध्ये 90 मि.ली. ने भरलेल्या 2000 नग राकेट संत्रा देशी दारू किंमत 70,000 हजार रुपये व सँट्रो कार क्र. MH 31 CM 3703 किंमत 80,000 रुपये असा एकूण 1,50,00 रु चा माल आढळून आला. पोलिसांनी दारू वाहनासह जप्त केली आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात विरूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जयप्रकाश निर्मल, लाठी पोलीस स्टेशन चे ठाणेदार युवराज सहारे यांच्या नेतृत्वात पो.शी. विजय तलांडे, सुरेंद्र काळे, प्रल्हाद जाधव, नरेश शेंडे यांनी केली.
तेलंगणा राज्यात देशी दारूची मोठी मागणी असल्याने सातत्याने राजरोसपणे देशी दारूचा पुरवठा लगतच्या राजुरा व गोंडपिपरी तालुक्यातून केला जात असल्याची खात्रीलायक माहिती आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची यासंदर्भात उदासीन वृत्ती दिसून येत असल्याने यावर कोणतीही ठोस कारवाई होताना दिसून येत नाही. आर्थिक मायेमुळे देशी दारू तस्करांच्या मुसक्या आवळण्यात सबंधित विभागाला अद्याप तरी यश आलेले नाही का…? असा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ उंटावरून शेळ्या हाकण्यात विभाग धन्यता मानत असल्याचे चित्र दिसून येते. पोलीस विभागाने केलेल्या सदर कारवाईमुळे देशी दारू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.