मोफत कपड्यांचे वाटप
राज्यशास्त्र विभागाचा स्तुत्य उपक्रम
लोकमान्य टिळक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रत्येक महिन्यात वणीतील गरजवंत नागरिकांना आवश्यक कपड्यांचे मोफत वाटप करीत असतात. यावेळी 25 फेब्रुवारी ते 11 मार्च 2023 या15 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात कपडे गोळा करण्यात आले. यात महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व वणी शहरातील अनेक नागरिकांनी आम्हाला कपडे आणून दिलेत म्हणजे एक सामाजिक दायित्वाच्या मार्मिकत्वाचा संदेशच त्यांनी आपल्या सहकार्याच्या माध्यमातून दाखवून दिला. समाजातील गोरगरीब, दिनदुबळ्या लोकांना मदतीचा हात आपण दिला,सहकार्य केले तर यातून जे आत्मिक समाधान मिळते ते वेगळेच असते असे मत सहकार्य करणाऱ्या व्यक्तींनी व्यक्त केले तसेच पुढे जमा झालेल्या कपड्यांचे वाटप आज दि 12/3/2023 ला महाविद्यालयाच्या परिसरात सकाळी 9 ते 12 या दरम्यान करण्यात आले. यावेळी 175 कपड्यांचे वाटप झाले या उपक्रमाला अनेक गरजवंत नागरिकांचा भरगोस प्रतिसाद लाभला या उपक्रमकरिता राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ विकास जुनगरी यांनी पुढाकार घेतला तसेच डॉ गणेश माघाडे यांचे सहकार्य लाभले आणि या उपक्रमामध्ये धनश्री तेलंग,शेजल येसेकर,वैष्णवी निखाडे, अंकुश झाडे, करण ढुरके, साई दुधलकर,गौरव नायनवार या विद्यार्थ्यांनी योगदान दिले. उपक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानाझोडे यांचे मार्गदर्शन लाभले.