शहरातील महिलांनी घेतले सक्षमीकरणाचे धडे

0
699

शहरातील महिलांनी घेतले सक्षमीकरणाचे धडे

ना. मुनगंटीवार यांचे द्वारे स्थापित प्रकल्पांना दिली भेट

महिलादिनाला उत्कृष्ट महिला मंचाचा उपक्रम

माजी नगरसेविका छबुताई वैरागडे यांचा पुढाकार

चंद्रपूर जिल्ह्याकडे आजही मागास जिल्हा म्हणून बघितले जाते.विपुल वन वैभव असतांना मात्र येथे पाहिजे तसा विकास झाला नाही.परिणामी महिलांचे सक्षमीकरण हा मुद्दा आजही कायम आहे.हा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी येथील पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार सतत प्रयत्नशील आहेत. त्यांच्या विशेष प्रयत्नातून व महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उल्लेखनीय प्रकल्पांना, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महानगरातील उत्कृष्ट महिला मंचाच्या मातृशक्तीने माजी नगरसेविका छबुताई वैरागडे यांच्या नेतृत्वात भेट देत, महिला सक्षमीकरणाचे धडे घेतले. या अभ्यास दौऱ्यात शहरी व ग्रामिण मातृशक्तीचे एकत्रीकरण झाल्याने हा विषय चर्चेचा ठरला.

लोकनेते विकास पुरुष पालकमंत्री तथा सांस्कृतिक मंत्री
श्री. सुधीर भाऊ , मुंनगटीवार यांच्या, सहकार्याने साकारलेले अप्रतिम प्रकल्प, सैनिक स्कूल, अगरबती प्लांट, बांबू आर्ट कार्पेट आणि आता महिलांसाठी येणारे विद्यापीठ जिल्ह्यातच नव्हेतर राज्यात चर्चेचा विषय आहे. या विद्यापीठात कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम शिकविले जाणार आहेत. हे अभ्यासक्रम विशेषतः चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण अभ्यास करून तयार होत असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. महिला सक्षम झाली की कुटुंब सक्षम होते हे सर्वश्रुत आहे.त्यामुळेच जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून उत्कृष्ठ महिला मंचाने पोंभुरणा येथे जाऊन महिला सक्षमीकरणांच्या विविध प्रकल्पाची पाहणी केली.यात बचत गटांद्वारे सुरू असलेले कुक्कुटपालन, उदबत्ती उद्योग व टूथ पीक चा समावेश होता.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे हजारो महिलांना मिळालेला रोजगार महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण आहे.

यावेळी उत्कृष्ठ महिला मंच अध्यक्षा, तथा माजी नगरसेविका सौ छबू ताई वैरागडे, साक्षी कार्लेकर प्रा स्नेहल बांगडे, पूजा पडोळे, प्रणिता जुमडे,किरण बल्की, सारिका बोराडे, संगीता बोरीकर ,वसुधा बोडखे,जयश्री साखरकर, योगिता रघाताटे, मंजुषा ढवस, सुचिता मोरे, लता साखरकर, हर्षा साठोने, रुपाली चीताडे शीतल चौधरी, शिला शेंडे उज्वला हजारे, विद्या बुरटकर,सारिका भुते, अर्चना चहारे, मंगला शिंदे, सर्व सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here