जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची घुग्घूस प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट, काँग्रेसच्या तक्रारीची दखल

0
656

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची घुग्घूस प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट, काँग्रेसच्या तक्रारीची दखल

घुग्घूस : येथील शासकीय रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध राहत नसून स्वच्छतेचे अभाव व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा सह अनेक समस्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात दिलेल्या भेटीत प्रामुख्याने दिसून आल्या होत्या. या संदर्भात औषधी सह अन्य समस्या तातळीने सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी, कामगार नेते सैय्यद अनवर व शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत यांची प्रत्यक्ष भेट घेवून समस्या निरदर्शनास आणून दिल्या होत्या. कर्तव्य तत्पर वैद्यकीय जिल्हा अधिकारी डॉ. गहलोत यांनी तक्रारीची दखल घेत काल दिनांक 09 मार्च रोजी दुपारी 12 वाजता रुग्णालयाला भेट देत रुग्णालयाचा आढावा घेतला. व वैद्यकीय अधिकारी कुंडू यांना समस्या निवारणाच्या सूचना ही दिल्या तसेच येत्या आठ दिवसांत औषधी सह सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन ही दिले.

काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांनी शहरातील नागरिकांना व राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की, सार्वजनिक रुग्णालयाला मदतीची आवश्यकता असून सर्वांनी आपल्या क्षमते प्रमाणे मदत करावी त्याठिकाणी घाण होऊ नये याकडे लक्ष द्यावे. तसेच रुग्णालयात सर्वच वैद्यकीय अधिकारी या मातृशक्ती महिला शक्ती असून त्यांच्याशी सौजन्याने वागण्याचा प्रयत्न करावा. व एक आदर्श शासकीय रुग्णालय निर्मितीस हातभार लावावा अशी विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here