देशाला प्रगतीपथावर नेणारा आणि विकासासाठी झटणारा पक्ष म्हणजे भाजपा!
पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रम प्रसंगी वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
रमेश बुच्चेसह येरूर गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
चंद्रपूर, दि. ६ : देशातील शेवटच्या माणसाच्या कल्याणाचा विचार करणारा पक्ष म्हणजे भाजपा. विश्वगौरव, देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास या संकल्पनेसोबत राष्ट्राचा विकास साधायचा असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही, देशाला प्रगतीपथावर नेणारा आणि विकासासाठी झटणारा पक्ष म्हणजे भाजपा असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.
भाजप चंद्रपूर जिल्ह्यातर्फे आयोजित येरूर येथील भाजपा प्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, पक्षात प्रवेश करणारे रमेश बुच्चे, प्रदीप जोगी, बंडु देव, भाजपाचे महामंत्री नामदेव डाहुले, धनगर समाज जिल्हाध्यक्ष योगीराज उगे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, प्रदेश सचिव अनिल डोंगरे, भाजयुमो महामंत्री महेश देवकते, हरीश्चंद्र पारखी, गुणवंत चंदनखेडे, गीता कळसकर, रेखा मोंढे, पडोलीचे सरपंच विक्की लाडसे, सोनेगावचे सरपंच संजय उकीनकर, पंढरीनाथ पिंपळशेंडे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की विकासाच्या आणि विनाशाच्या लढ्यामध्ये अनेकांनी आज विकासाची म्हणजे भाजपाची कास धरली आहे. रमेश बुच्चे यांच्यानेतृत्वात भाजपा पक्ष प्रवेश अनेक कार्यकर्त्यांनी केला, आपल्या भागातील विकासाला प्राधान्य देण्यासाठी योग्य निर्णय घेतला आहे. आपण पूर्ण शक्तीनिशी पक्षात प्रवेश करणाऱ्यांच्या पाठीशी राहु, असे ना. मुनगंटीवार म्हणाले. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. त्यामुळे कानाकोपऱ्यात विकासाची गंगा पोहचविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. केंद्र आणि राज्यात भाजपाचेच सरकार असल्याने विकासाला आता गतिरोध बसणार नाही, असा विश्वासही ना. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
शेतकरी अडचणीत असल्याचे नमूद करीत ना. मुनगंटीवार म्हणाले की, शेती हा चिंता कमी करणारा व्यवसाय झाला पाहिजे. त्यासाठी मिशन ‘जय किसान’ सुरू करण्यात आलेले आहे. या मिशनच्या माध्यमातून चंद्रपुरातील शेतकऱ्यांचा कायापालट व्हावा. महिला सशक्तीकरणावर केवळ चर्चा न होता आंतरराष्ट्रीय महिला दिनी त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावरही चर्चा होणे गरजेचे आहे. महिलांच्या उद्योजकतेबाबत चर्चा झाली पाहिजे. कामगारांच्या हिताचा निर्णय मंत्रिमंडळात करण्यात आला. कामगारांचे तास, त्यांचा भविष्य निर्वाह निधी याची निश्चिती या निमित्ताने झाल्याचा आनंद वाटतो, असे ना. मुनगंटीवार म्हणाले.
पक्ष प्रवेश कार्यक्रमात ज्ञानेश्वर बोबडे,बाळा बिटे,रामभाऊ बुच्चे,प्रेम जोगी,सुधीर तुरारे,विजय तुरारे,आवेश आवळे, अनिल उपरे, विकास तुराणकर,गणपत करपीते, आशिक शुद्दलवार,रमेश सोनटक्के,प्रशांत जोगी, नितीन कडस्कर, नंदू श्रीखंडे, गोपिका निखारे, पायल झाडे, नंदा धोरुडे, वैशाली मोरे, सुवर्णा बिटे, किरण वैद्य, पंचफुला जोगी, नीलिमा बुच्चे व अन्य शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.