नवसाला पावणारी आई श्री. देवी सोमजाई देवस्थानच्या वतीने पालखी उत्सव सोहळा
मुंबई प्रतिनीधी : महेश कदम
ता. महाड, जि. रायगड, वाकी बु. कोकणात होळी शिमगाला अधिक महत्त्व आहे. निसर्ग वातावरणात असलेले ह्या कोकणात होळी भक्तिभावाने साजरी केली जाते. होळी शिमगा उत्सवात चाकरमणी अगोदर येउन रितसर पारंपरिक पद्धतिने होळी पेटवून गाराणे बोलुन नवस करतात, नाच गाणी करतात. होळी च्या दुसर्या दिवशी आई श्री. सोमजाई ची पालखी मिरवणूक गावोगावत फिरवली जाते. आई श्री. सोमजाई ही स्वयंभु व पुरातन जागृत देवस्थान मंदिर आहे. देवीचा महिमा आपल्या सर्व भक्तांना ज्ञात आहे. ह्या मुर्ती पाषाणकाळातील असून ह्यात आई सोमजाई, भैरी, जोगेश्वरी, जननी, पांगारकरीण, काळकाई, नामदाईकरीण अशी ईतिहास काळातील प्राचीन मुर्ती आहेत पालखी मिरवणुक अगोदर साफसफाई, रंगरोठी, रांगोळी, लाईटिंग सजावट केली जाते, देवीचे मुखवटे, दागिने व वस्त्र ने सजवले जाते, आईचा रुप शोभुन दिसते. सदर उत्सव हे मंगळवार दि. ०७ मार्च २०२३ पासून ते बुधवार दि: १५ मार्च २०२३ पर्यंत संपन्न होणार आहे तरी आपण सर्व कुटुंब व मित्र परिवार ह्या सोहळा मध्ये उपस्थित राहवे अशी सोमजाई देवस्थान मंदिरा च्या अध्यक्षा ने सुचित केले आहे. तरी आपण आपल्या सर्व कुटुंब व मित्र नातेवाईक ह्या पालखिला उपस्थित राहून कृपाप्रसादाचा व आशिर्वादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. कार्यक्रमाची रूपरेषा खालील प्रमाणे आहे, मंगळवार दि:०७ /०३/२०२३ दुपारी ३ ते ४ वाजता पालखी सजावट (गादीवर) नंतर पालखी सोमजाई मंदिराला भेट व प्रदक्षिणा त्यानंतर शेवते गावाकडे प्रस्थान व रात्री गावठण येथे वस्ती. अशा प्रकारे दि: ०८/०३/२०२३ पासून ते १५/३/२०२३ पर्यंत प्रतेक गावात पालखी मिरवणूक थाटामाटात केली जाते. त्या मध्ये शेवते, गावठण, नानेमाची आवाड, आंब्याचा माळ, खरकवाडी, संत रोहिदासवाडी, शेदुरमळई, नारायणवाडी, नांदरुकवाडी, पेडामकरवाडी, शिवाजीनगर येथे प्रस्थान होऊन पालखी मिरवणूक केली जाते. प्रत्येक गावात पालखी आल्यावर तिची खणानारळाणे ओठी भरली जाते, पालखीवर शाळ ठेवली जाते, फळ व मिठाई दाखवली जाते, नवस फेढला जातो, दर्शनासाठी चाकरमणी वेगवेगळ्या ठिकाणीतुन येतात, वाजत गाजत पालखी आणली जाते, पालखी नाचवली जाते, फटाके, ढोलताशे वाजवले जातात, येणारे लोकांचे पाऊणचार केला जातो, पालखी मुक्कामाच्या दिवशी भजन, कीर्तन असतो मग शेवटी देवीची पालखी गादीवर विसर्जन होते, सर्व विश्वस्त व ग्रामस्थ उपस्थित असतात. ह्या उत्सवाला श्री. संजय गंगाराम कदम (अध्यक्ष), श्री. प्रकाश चंद्रु दरेकर (उपाध्यक्ष), श्री. श्रीरंग भागोजी भोसले (सचिव) व विश्वस्त श्री. मोहन रामचंद्र म्हामुणकर, श्री. प्रदीप रघुनाथ म्हामुणकर, श्री. प्रभाकर दिनकर कदम, श्री. दिपक यशवंत कदम, श्री. गणपत विठोबा सालेकर, श्री. सदाशिव दगडु मोरे, श्री. रोहिदास रामा जाधव, श्री. बबन शिवराम मोरे, श्री. सुरेश मोतीराम म्हामुणकर व गावचे सरपंच श्री. द्वारकानाथ जाधव सर सहित अनेक गावकरी, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार असून थाटामाटात पालखी मिरवणूक उत्सव सोहळा भक्तिभावाने दरवर्षी प्रमाणे साजरा केला जाणार आहे. तरी आपण सर्वानी दर्शनास यावे असे आवाहन अध्यक्ष, विश्वस्त व समस्त ग्रामस्थ गावकरी यांनी केले आहे.