विवेकानंद विद्यालयात व्यावसायिक शिक्षण कार्यशाळा संपन्न
वणी: शहरातील प्रसिद्ध विवेकानंद विद्यालय वणी येथे व्यावसायिक तथा समाजसेवक सागर मुने यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणा वर कार्यशाळा घेतली. विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेत अभ्यासाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असून विद्यार्थ्यांनी व्यवसायाचे ज्ञान आत्मसात करणे, आत्मविश्वासू असणे गरजेचे आहे. मेहनत, प्रामाणिकपणा, नियोजन, तत्व, देणे घेणे, लोकांसोबत प्रेमाने बोलणे, प्रत्येक व्यवसाय हा उभा करायला भांडवल लागत नाही, तर इच्छा शक्ती असेल तर आपण मोठा कारखाना, कंपनी उभारू शकतो असे कार्यशाळेत सांगितले. शिक्षण घेत असताना प्रथम श्रेणीत असले पाहिजे, एका पदवी वर अवलंबून न राहता चार पदवी असली पाहिजे, एका व्यवसायसोबत त्याला पूरक पुन्हा चार व्यवसाय ही काळाची गरज आहे. घेतलेले ज्ञान, शिक्षण हे कधीच वाया जात नाही, सकारात्मक दृष्टिकोन कसा बाळगावा याबाबत विविध उदाहरणे देऊन त्यांनी तो विद्यार्थ्यांना पटवून दिला. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय विद्यार्थी दशेतच निश्चित केले पाहिजे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सांगितले. यावेळी वरिष्ठ शिक्षक गेडाम मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल गोंडे आभार प्रितेश लखमापुरे यांनी केले. प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.