कवयित्री अर्चना सुतार यांच्या “कोरोनावरील”शब्दांकित केलेल्या १०० कवितांची वर्ल्ड रेकाँर्ड बुक मध्ये नोंद!
अनेकांनी केली त्यांचे कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा!
चंद्रपूर किरण घाटे जिल्हा प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्या अंतर्गत येत असलेल्या पाचवड येथील सहज सुचलं ग्रुपच्या सदस्या तथा सुप्रसिध्द कवयित्रि कु.अर्चना दिलीप सुतार (पाचवड) यांनी जगभरात कोरोनाचा उद्रेक सुरु झाला. तेव्हापासून प्राणघातक कोरोना बचावासाठी काही कविता साेशल मीडियाच्या माध्यमांतुन त्यांनी नागरिकांसमोर मांडून संपुर्ण भारतभर जनजागृती करण्याचे अमूल्य व मोलाचे कार्य केले आहे .त्याचे श्रेय म्हणून त्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याने तदवतचं भारतातील प्रत्येक राज्याने सन्मान देऊन (त्यांना )गौरविले आहे .त्यांच्या या महान (समाज )कार्यामुळे अनेक संस्थांनी त्यांना कोविड योद्धा, समाज भूषण,प्रेरणादायी, कर्मवीर पुरस्कार व सन्मानपत्र दिले आहे तर तमिळनाडू राज्याने जेंटल वूमन आणि आंध्रप्रदेश राज्याने डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले आहे हे येथे विशेष उल्लेखनीय आहे. सर्वात महत्वाची बाब अशी की अर्चना सुतार आंतरराष्ट्रीय पुरस्काराच्याही मानकरी ठरल्या आहे. इतकेच नाही तर श्रीलंका देशाने त्यांना जीवनंदा ॲप्रिसिएशन फॉर नोबेल वर्क तथा इंटरनॅशनल महात्मा गांधी आयकॉन 2020 हे दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे .त्यांच्या या कार्याची माहिती जगभर पसरल्याने त्यांचे कार्य अधिक उल्लेखनिय व चमकदार हाेत गेले.आता तर याच प्रसिध्दीच्या झाेतात असलेल्या नामवंत कवयित्रिची “वर्ल्ड रेकॉर्ड बुक”मध्ये (त्यांच्या)कोरोना संदर्भातील स्वयं शंब्दाकित केलेल्या १०० कवितांची नोंद करण्यात आली आहे.
कु. सुतार यांचे या समाजहित दक्षिणी कार्याची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा होत आहे. त्याचे या भरीव कार्याचे गाेड काैतुक व अभिनंदन सहज सुचलच्या मुख्य संयाेजिका (चंद्रपूर जिल्ह्यातील)राजूरा निवासी तथा विदर्भातील जेष्ठ लेखिका अधिवक्ता मेघा धाेटे , सहसंयाेजिका व काव्यकुंजच्या संयाेजिका मायाताई काेसरे , नागपूर उपराजधानीच्या प्रभा अगडे , रजनी रनदिवे मुंबई , श्रुती उराणकर, अल्का गंगशेट्टीवार , सुवर्णा कुळमेथे ,वैशाली रामटेके , अनिता भिमूनवार , जास्मिन शेख , कविता चाफले , पूनम रामटेके , सरीता काेटनाके , प्रतिक्षा झाडे , संजीवनी धांडे , मंजुषा दरवरे , वंदना हातगांवकर , भाग्यश्री हांडे , अर्जुमन शेख , वंदना आगरकाठे , अँड.अंजली साळवे , नयना झाडे , अनिता आष्टनकर , भारती मैदपवार ,सराेज हिवरे , यामिनी नैताम , छबुताई वैरागडे , प्रतिमा नंदेश्वर ,जेष्ठ लेखिका स्मिता बांडगे , विजया तत्वादी , विजया भांगे , गीताताई बाेरडकर , सिमा गणविर , वर्षा शेंडे , उज्वला पाटील , प्रिया खनके , श्रध्दा हिवरे , मंजुषा दरवरे , पपिता जुनघरे, कल्पना पाटील , भारती काटकर , पायल तेलंग , शारदा झाडे , मयुरी समर्थ , ज्याेती इंगळे , ज्याेती मेहरकुरे ,अर्चना चावरे आदिंनी केले आहे .