डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठी भाषा

0
690

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आणि मराठी भाषा

डाॅ.बाबासाहेब आंबेडकराना इंग्रजी,मराठी सह एकूण आठ भाषा अवगत होत्या.त्या येणेप्रमाणे; मराठी,इंग्रजी,फ्रेंच,जर्मन पर्शियन,पाली,गुजराथी व संस्कृत. एका मुलाखतीत ते म्हणतात, मला भाषांची फार आवड आहे.मी इंग्रजी तर उत्तम जाणतोच, इंग्रजी इतकाच मला मराठीचा ही अभिमान आहे. मी कैक वर्षे “बहिष्कृत भारत” “मुकनायक” व “जनता” या साप्ताहिकांचा संपादक होतो व मराठीत मी बरेच लिखाण केलेले आहे…..मी जर्मन भाषेचा ही अभ्यास केला आहे.आता मी ती थोडी विसरलो असलो तरी थोड्या दिवसाच्या साफसफाईने मी ती पुनः वाचू शकेन अशी उमेद आहे.मी परवा गुजराथीत अहमदाबादेस व्याख्यान दिले होते… मराठीत व्याख्यान देण्यास मला प्रथम उगीचच भिती वाटत होती पण मराठीत मी चांगले बोलू शकतो असे मला आढळून आले.मला फ्रेंच भाषा पण येते…. आमच्या संस्कृतच्या मास्तरांनी ‘अस्पृश्यांच्या पोराना मी संस्कृत शिकवणार नाही’ असा हट्ट धरल्यामुळे माझ्या भावाला अगदी निरूपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पडले.ते मास्तर वर्गात आमची हेटाळणी करत.त्यामुळे मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत असे.मी सुद्धा जेंव्हा इंग्रजी चवथ्या इयत्तेत आलो तेंव्हा आमच्या संस्कृत मास्तराचा हट्ट मलाही भोवणार हे नक्की असल्याने मला पर्शियन भाषेकडेच निरुपायाने धाव घेणे भाग पडले.मला संस्कृत भाषा शिकण्याची इच्छा होती.आता मी ती स्वतःच्या प्रयत्नाने थोडे संस्कृत समजू शकतो,वाचू शकतो व बोलू शकतो.”

नवयुग दि.१३-४-१९४७ आंबेडकरांसोबत गप्पागोष्टी प्रा.सत्यबोध हुदलीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here