धाडसी बँक दरोडा आणि एक चुक
औद्योगिक वसाहतील चंद्रपूर-घुग्घुस एमआयडीसी भारतीय स्टेट बँकचे लाॅकर तोडून १४ लाखाच्या धाडसी दरोडा प्रकरणी पोलिसांनी चुलत भाऊ असलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे.या प्रकरणातील आरोपींचे नावे तपासकार्यात व्यत्यय नको म्हनुन गुप्त ठेवण्यात आली आहेत.
सीसीटिव्ही, डिव्हीआरसोबत घेवून गेलेले चोरटे चारचाकी वाहनावरील एका वाक्यामुळे पोलिसाच्या जाळात अडकले.
चंद्रपुर-घुग्घुस मार्गावरील एमआयडीसीतील भारतीय स्टेट बँक गत आठवड्यात शनिवार व रविवार अशा सलग दोन दिवसाच्या सुट्या बघुन दरोडेखरांनी दरोडा घातला.
सोमवारी सकाळी बँक पूर्ववत सुरु होताच अधिकारी व कर्मचाऱ्यांना बँकेच्या आतील लाॅकर तोडलेले दिसले. चोरट्यांनी अनेक दिवसांपासुन या बँकेवर पाळत ठेवली होती.त्यामुळे सीसीटिव्ही फुटेजमध्ये दरोड्याची घटना येनार नाही,याची काळजी या चोरट्यांनी घेतली. त्यामुळे आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे.
सीसीटिव्ही कॅमेरे कुठे लागले आहे, याची इंत्यभूत माहिती चोरट्यांना होती.त्यामुळे बँक परिसरात प्रवेश करताच आधी सीसीटिव्ही कॅमेर्यावर त्यांनी एक विशिष्ट प्रकारच्या द्रव्याची फवारणी केली.खिडकी तोडुन आत गेले. गॅस कटरने कापले. त्यातील चौदा लाख रुपये घेवून ते पसार झाले.सीसीटिव्ही कॅमेर्याचे फुटेज संग्रहीत यंत्राणाही स्वतःसोबत घेऊन गेले.