बोर्डा झुल्लूरवार येथे तनसीचे पाच ढीगारे जळून खाक ; मोठा अनर्थ टळला

0
632

बोर्डा झुल्लूरवार येथे तनसीचे पाच ढीगारे जळून खाक ; मोठा अनर्थ टळला

स्मशानभुमीतील ५०० निलगिरीची झाडे आगीच्या चपेट्यात; तर एका शेतकऱ्याचे सागवण झाडं जळली

पोंभूर्णा:- पोभूर्णा तालुक्यातील बोर्डा झुल्लुरवार येथे भीषण आग लागल्याने पाच तनसीचे ढिगारे जळुन खाक झाले.सदर घटना शुक्रवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली.यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून ग्रामपंचायतच्या मालकीचेही सोंदर्यीकरण व वृक्षलागवड केलेले ५०० नीलगीरीच्या झाडाचेही मोठे नुकसान झाले.यात एका शेतकऱ्याचे सागवाणाचे झाडं आगीच्या चपेट्यात आले.यावेळी गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात आली नाही.

धानाची मळणी करून पाळीव जनावरांसाठी ठेवलेल्या तणसीच्या ढिगाऱ्याजवळ एका शेतात आग लागली होती.ती आग पसरत स्मशानभूमी परिसरात ठेवलेले तनसीच्या पाच ढिगाऱ्याला लागली काही क्षणातच ते ढिगारे जळून खाक झाले.बाजुलाच असलेल्या स्मशानभूमी परिसरातील ग्रामपंचायतने सोंदर्यींकरण व वृक्षलागवड केलेले ५०० झाडांचीही यात मोठी नुकसान झाली.यावेळी आनंदराव सातपुते यांचे सागवण व निलगिरी झाडं आगीच्या चपेट्यात आले.

या घटनेत दिलीप गद्देकार,बंडू नैताम,पांडुरंग शेंडे,विनायक नैताम,प्रभाकर रामटेके यांचे तनसीचे ढीगारे जळून खाक झाले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी आपापल्या परीन प्रयत्न केले. काहींनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती दिली.अग्निशामनची घटनास्थळी येत पर्यंत मोठ्या प्रयत्नाने गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवीलं. घटनास्थळापासून गाव जवढंच होतं.आग आटोक्यात आल्यानं मोठी घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच पोंभूर्णा पोलिस स्टेशनचे ठाणेदार धर्मेंद्र जोशी, सरपंच संघटनेचे अध्यक्ष भालचंद्र बोधलकर, मंडळ अधिकारी शेडमाके, सरपंच संगिता गव्हारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय ढोंगे, सामाजिक कार्यकर्ते राकेश गव्हारे,संजय ढोंगे, कामगार संघटनेचे अध्यक्ष अविनाश वाळके, सुनील कुंदोजवार, पोलिस पाटील विकास रामटेके, कोतवाल रंजीत नैताम आदींची उपस्थिती होती.

“या आगीत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.”
भालचंद्र बोधलकर,
तालुका अध्यक्ष सरपंच संघटना,पोंभूर्णा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here