गोपाला! गोपाला! देवकीनंदन गोपाला! काँग्रेस कार्यालयात गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी
घुग्घूस : थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची जयंती काँग्रेस कार्यलयात काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने संतांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून राष्ट्रसंताच्या विचारांचे समरण करून जनमानसां मध्ये जागरुकता आणि स्वच्छतेचे सामाजिक आचरणाचा संदेश देत उत्साहात साजरी करण्यात आली.
महाराष्ट्राच्या अमरावती येथील पावन भूमीवर 23 फेब्रुवारी 1876 साली संत गाडगेबाबा यांचा जन्म झाला संतांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते.
गाडगेबाबा कधी ही मंदिरात दर्शनासाठी गेले नाही त्यांनी कधी ही कुणाला आशिर्वाद दिला नाही.
आशिर्वाद घेण्यासाठी खाली वाकणाऱ्यांच्या पाठीत ते खराटा घालत बाबांनो मंदिरा ऐवजी शाळा बांधा एक वेळी उपाशी रहा मात्र आपल्या मुलांना शिकवा असे ते पोट तिडकीने आपल्या कीर्तनात सांगत आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धा, जातीपाती आणि व्यसनावर ते प्रहार करीत धर्मशाळेत व देवळाच्या प्रांगणात राहत असे.
आज जयंती निमित्त धोबी परीट जनकल्याण संस्थेच्या वतीने शहरात मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीतील शामिल नागरिकांनी काँग्रेस कार्यालयात भेट देत गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून मानवंदना अर्पित केली. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपालाचा गजर करण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेस नेते शामरावजी बोबडे,सैय्यद अनवर,सुधाकर बांदूरकर,अलीम शेख,रोशन दंतलवार,देव भंडारी,शहजाद शेख,सुनिल पाटील,कुमार रुद्रारप,कपिल गोगला,अमित सावरकर,सन्नी कुम्मरवार,अंकुश सपाटे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते