एक हात मदतीचा या संकल्पनेतून शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सामाजिक कार्यात रुजू असलेला राजुरा तालुक्यातील नोकारीचा तिलक पाटील हा सरसावला.

0
514

एक हात मदतीचा या संकल्पनेतून शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी सामाजिक कार्यात रुजू असलेला राजुरा तालुक्यातील नोकारीचा तिलक पाटील हा सरसावला.

राजुरा

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे शेतकरी वर्ग आज अतीवृष्टीच्या पाण्यामुळे त्यांच्या शेतात असलेले पीक संकटात आहे कापूस पूर्णपणे पाण्याने खराब होत आहे हे माझ्या लक्षात आले शेतकऱ्यांची मदत करायला पाहिजे, नुसतं भारत देश हा कृषिप्रधान देश आहे असे म्हणल्याने होत नाही संकटाच्या वेळी त्यांची मदत केली केली पाहीन वावर आहे तर पावर आहे हे आता नावापुरतच मर्यादित राहील आहे , शेतकऱ्यांबद्दल असलेले प्रेम हे फक्त बोलून कीव्हा मीडिया च्या माध्यमातून दाखविल्याने होत नाही आता खरी वेळ आली आहे शेतकऱ्यांची मदत करण्याची
शेतकऱ्यांचा कापूस वेचून द्यायचा हे मी ठरवलं आणि अजून काही विद्यार्थांना प्रोत्साहित केल पण बाकीचे pubg आणि free fire च्या नादात व्यस्थ आहे , आम्ही का पोरी अहो का कापूस वेचाला अस मला उत्तरे मिळत होते पण मी त्या उत्तराने निराश न होता स्वतः एकटा व माझ्या सोबत माझा भाऊ कापूस वेचण्या साठी मदत करण्यासाठी येतो शेतात जेव्हा शेतकऱ्यांचे शब्द कानी पडते मन कस हेलावून जाते खूप नुकसान होत आहे पाण्यामुळे काही खर नाही या वर्षी असे शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा डोळ्यात पाणी येते
असे प्रतिनिधीशी बोलताना तिलक पाटील यांनी सांगितले
पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतात पिकत असलेले कापूस पीक पाण्यामुळे अळ्या पडून सडत आहे हे सामाजिक कार्यात असलेल्या तिलक पाटील या युवा विद्यार्थाच्या लक्षात आले त्याने शेतकऱ्यांचा कापूस वेचून द्यायचा ठरवले हे ठरवताच तिलक चा स्वतःचा भाऊ अभिषेक पाटील तयार झाला व सहकारी मित्र तयार झाला व गावालगतच्या शेतात जाऊन कापूस वेचण्यासाठी मदत करत आहे
तिलक पाटील या विद्यार्थ्याने गावात लॉक डाऊन ज्ञान शाळा सुरू करून मुलांना शिकवतो त्या उपक्रमाला खूप प्रतिसाद मिळत आहे तिलक पाटील चे शिक्षण विदर्भ महाविद्यालय ऑफ यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे पॉलिटिकल सायन्स या विषयात अंतिम वर्षाला पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत fitter या शाखेचे प्रशिक्षण घेत आहे
मोठा भाऊ सदैव सर्वांची मदत करतो हे त्याला माहीतच असल्यामुळे तीलकचा लहान भाऊ नेहमी प्रत्येक कामात खंबीर पणे पाठीशी उभा राहतो
असे तिलक पाटील ने बोलताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here