बसस्थानक परिसरातील दुकानदारांना बस स्थानकातील दुकानं उपलब्ध करा : राजुरेड्डी
घुग्घुस : येथील नवनिर्मित बस स्थानक परिसरातील छोटे व्यापाऱ्यांना राज्य परिवहन विभागातर्फे सरंक्षक भिंतीचे काम करण्यासाठी अतिक्रमित दुकाने हटविण्या संबधीत नोटीस देण्यात आली आहे. सदर दुकाने एका आठवड्यात अतिक्रमण असलेले दुकाने न हटविल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा ही दिला आहे.
व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस पक्ष मैदानात उतरला असून राजुरेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी एस टी वर्कशॉप कार्यालयात संबंधित अधिकारी व्यवहारे यांच्याशी चर्चा करून बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांना बस स्थानक संकुलात निर्माण करण्यात आलेल्या दुकाने सदर व्यापाऱ्यांनाच देण्यात यावे अशी मागणी केली. दुकानाचे लिलाव जाहीर झाल्याची माहिती व्यापाऱ्यांना का दिली नाही अशी विचारणा ही केली
यासंदर्भात व्यवहारे यांनी लिलावा संदर्भात संपूर्ण माहिती आपणास देत असून आपण व्यापाऱ्यांना ता लिलावात शामिल होण्यास सुचवावे असे विनंती केली. याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, रोशन दंतलवार,रोहित डाकूर,देव भंडारी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महोदय सदर व्यापारी हे गेल्या अनेक वर्षांपासून या जागेवर आपली दुकाने चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. आता हे कुटुंब बेरोजगारी,उपासमारीच्या संकटात सापडतील कृपया या सर्व व्यापाऱ्यांना बस स्थानक संकुलातील दुकानं आवंटीत करून यांच्यावर उपकार करावा ही विनंती त्यांनी केली.