बेजबाबदार, महाभ्रष्ट ठाणेदार स्वप्नील धुळे ची उलटी गिनती सुरु..!

0
2067

बेजबाबदार, महाभ्रष्ट ठाणेदार स्वप्नील धुळे ची उलटी गिनती सुरु..!
लाचलुचपत विभागाने धुळे विरुद्ध तात्काळ कार्यवाही करावी
मिळकती पेक्षा जास्त संपत्ती
धुळे कडे रिसॉर्ट, बंगला, जेसीबी सारखी महागडी यंत्र सामग्री…?

“पगारा शिवाय अतिरिक्त जास्तीची संपत्ती गोळा करून करोडोपती होण्याच्या नादात अधिकाराचा गैरवापर करून फिर्यादीस त्रास देणारे, रेती तस्कर व महिले बाबत वाईट सवयीचे बेजबाबदार पोलीस निरीक्षक स्वप्नील धोंडीराम धुळे”

युवा स्वाभिमान संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सूरज ठाकरे यांनी बेजबाबदार, महाभ्रष्ट पोलीस निरीक्षक स्वप्नील धोंडीराम धुळे विरुद्ध दिलेल्या तक्रारी नुसार उर्मट ठाणेदार स्वप्नील धुळे ची उलटी गिनती सुरु झालेली आहे. पगारा शिवाय अतिरिक्त जास्तीची संपत्ती गोळा करून करोडोपती होण्याच्या नादात अधिकाराचा गैरवापर करून फिर्यादीस त्रास देणारे, रेती तस्कर व महिले च्या बाबत वाईट सवयीचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धोंडीराम धुळे च्या मिळकती पेक्षा जास्त असलेल्या संपत्तीची चौकशी होऊन धुळेंना पोलीस विभागातून बडतर्फ करून त्यांचेवर पोलीस कार्यवाही व्हावी म्हणून चिमूर येथील गुरुदेव सेवामंडळाचे समाजिक कार्यकर्ते सारंग दाभेकर यांनी मागील दोन वर्षा पूर्वी स्वप्नील धुळे च्या विरुद्ध पोलीस तक्रार दिली होती.

लाचलूचपत विभागाला तक्रार देवूनही आज पर्यंत धुळेवर कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांची हिम्मत वाढलेली आहे. अधिकारी अशा बेजबाबदार, महाभ्रष्ट ठाणेदाराची पाठराखण का करतात ? हे एक न उलगडणारे कोडे च आहे.

अत्यंत अश्लील भाषेत मोबाईल द्वारे बदनामिकारक संदेश पाठवून समाजात बदनामी करणाऱ्या गुन्हेगारी स्वरूपाच्या चिमूर येथील महिले विरुद्ध पुराव्यासह तक्रार प्राप्त झाल्यानंतर बेजबाबदार, महाभ्रष्ट पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांनी कार्यवाही केली नाही.

उसनवारीने घेतलेल्या एक लाख रुपया पैकी चाळीस हजार रुपये फिर्यादीने परत मागू नये म्हणून आरोपी महिले नी मोबाईल द्वारे अश्लील भाषेतील संदेश लिहून फिर्यादीच्या मोबाईल वर व व्हाट्सअप ग्रुप वर पाठवून फिर्यादी व त्यांचे कुटुंबातील महिलांची सार्वजनिकरित्या बदनामी केल्यामुळे व जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने चिमूर पोलीस स्टेशन ला दिनांक 6/5/2019 दिनांक 28/10/2019 व दिनांक 30/1/2020 रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक स्वप्निल धोंडीराम धुळे (सद्या भंडारा येथे कार्यरत) यांचे कडे मोबाईल मधील स्क्रिन शॉट फोटो च्या पुराव्यासह लिखित तक्रार दिली होती. स्वप्निल धुळे यांनी एक दखलपात्र तक्रार स्विकारली. मात्र त्यावर फिर्यादिला बुद्धीपरस्पर अदखलपात्र गुन्ह्याची पोच दिली. व उर्वरित दोन तक्रारी उर्मट धुळेनी स्विकारल्या नाही. धुळेना महिलां बाबत असलेल्या वाईट सवयी प्रमाणे आरोपी महिले सोबत जवळीक साधली. स्वतः त्याने तिला किरायाचे खोलीवर (चिमूरला नवे कोरे संपूर्ण व्यवस्थेचे क्वार्टर असतांनाही) बोलावून कपोलकल्पीत खोट्या तक्रारी फिर्यादी विरुद्ध आरोपी महिले कडून लिहून घेतल्या व अधिकाराचा गैरवापर करून फिर्यादीच्याच विरुद्ध दोन खोटे विनयभंगाचे गुन्हे नोंदवून खोट्या गंभीर आरोपाच्या प्रकरणात फिर्यादीस फसविले. याच आधारे फिर्यादीच्या न्यायालयातील जमानती रद्द करण्यात याव्या असे दोन वेळा अर्ज धुळेनी न्यायालयात दाखल केले. महिलेचे स्वप्नील धुळे सोबत असलेल्या अत्यंत जवळच्या संबंधामुळे व आरोपी महिलेला खुश करण्यासाठी, तिचे सोबत जुळून राहण्या करिता अधिकाराचा गैरवापर करून स्वप्नील धुळे नी फिर्यादिला खूप नाहक त्रास दिला. धुळेनी आरोपी महिलेला फिर्यादी विरुद्ध न्यायालयामध्ये 164 चे खोटे बयान द्यायला लावले. कारण नसताना मोबाईल जप्त करण्याचे खोटे कारण न्यायालयात सांगून धुळे ने पोलीस कस्टडी रिमांड मध्ये फिर्यादीस अडकवले. न्यायाल्याने सुप्रतनाम्याचा आदेश केल्यांनतरही न्यायालायचा अवमान करून धुळे नी फिर्यादिला जप्त मोबाईल परत केला नाही. फिर्यादी कोणत्याही गंभीर गुन्हेगारी स्वरूपाचा नसतांना सुद्धा त्याचा तडीपारचा प्रस्ताव धुळे नी वरिष्ठाकडे बुद्धीपुरस्सर पाठविला. फिर्यादीचे माहिती अधिकाराचे कोणतेही अर्ज धुळे नी स्वीकारले नाहीत. वरिष्ठांनी आदेश दिल्यांनतर अर्ज स्विकारले तर धुळेनी माहिती दिली नाही. अशा अनेक प्रकारे फिर्यादीस आर्थिक, मानसिक त्रास दिला. मात्र फिर्यादी धुळेच्या त्रासापासून खचून न जाता व अन्याय सहन न झाल्याने आरोपी महिला व पो.नि. स्वप्नील धुळे विरुद्ध फिर्यादीने मा. न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी चिमूर न्यायालयात फौ.प्र. संहिता 1973 चे कलम 156 (3) खाली संपूर्ण दखलपात्र प्रकरण फौ.मा.क्र. 21/2020, फौ.मा.क्र. 22/2020, फौ.मा.क्र. 74/2020, दाखल केले. सदर मामल्यात मा. न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी यांनी दिलेल्या प्रकरण पडताळणीचा निर्णय फिर्यादीस अमान्य असल्याने फिर्यादी ने जिल्हा सत्र न्यायालय वरोरा येथे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 397 नुसार प्रकरण पडताळणी च्या लोअर कोर्टाच्या निर्णयाचे पुनरिक्षण होण्याबाबत फौ. पुनरिक्षण मा. क्र.15/2020, फौ. पुनरिक्षण मा. क्र.16/2020 व फौ. पुनरिक्षण मा. क्र.17/2020 असे प्रकरण दाखल केले. सदर मामल्यात सत्र न्यायालयाने पुनरीक्षण अर्ज मान्य करीत दिनांक 24/6/2022 रोजी फिर्यादीचे बाजूने निर्णय दिला. साडेतीन वर्ष तालुका न्यायालय चिमूर व जिल्हा सत्र न्यायालय वरोरा येथे फिर्यादीने प्रकरणाचा पाठपुरावा करून संघर्ष केला. शेवटी जिल्हा सत्र न्यायालय वरोरा यांनी आरोपी महिला व तिचे पती विरुद्ध तक्रारीचा तपास करण्याचे थेट आदेश पोलीस तपास अधिकारी चिमूर यांना दिले. तरी सुद्धा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास पाच महिने लागलेत. यासाठी सुद्धा तालुका न्यायालय व पोलीस स्टेशन ला फिर्यादीला वारंवार पत्र व्यवहार करावा लागला. व वारंवार कार्यालयात फेऱ्या कराव्या लागल्या. तेव्हा सदर आदेशाचे पालन करीत चिमूर पोलीस स्टेशन चे विद्यमान पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांनी आरोपी महिला व तिचे पती विरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 67 तसेच भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 294, 504, 506, व 34 नुसार फौजदारी गुन्हा क्रमांक 301, 302 व 303/2022 असे एकूण तीन गुन्हे दिनांक 3/11/2022 रोजी दाखल करण्यात आले आहे. वारंवार आरोपींच्या गुन्हेगारीचे स्वरूप पाहता त्यांच्या न्यायालयात या अगोदर दिलेल्या गुन्ह्यातील जमानती रद्द करण्याचा अर्ज न्यायालयात सादर करण्यात यावा. तसेच त्यांचे विरुद्ध तडीपार चे प्रस्ताव वरिष्टांकडे पाठविण्यात यावे. व तात्काळ आरोपींच्या अटकेची कार्यवाही पोलीस विभागाने करावी अशी फिर्यादीची मागणी आहे. फिर्यादीने तत्कालीन पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे हे रेती तस्कर व भ्रष्ट असून त्यांच्या कृष्ण कृत्याबाबत तसेच अधिकाराचा गैरवापर करून अवैध मार्गाने मिळकती पेक्षा जास्त संपत्ती जमविल्या बाबत वरिष्ठाना व लाचलूचपत विभागाला अनेक वेळा तक्रार दिल्याचे सांगून त्यांचेवर कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तेव्हा वरिष्टांनी अशा बेजबाबदार व नालायक पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे वर निलंबणाची कार्यवाही करून विभागीय चौकशी करावी. त्यांच्या संपत्ती बाबत त्यांच्या बहू पत्नी, संतती बाबत चौकशी व्हावी. अशी फिर्यादीने मागणी केलेली आहे.

कायदा हा कोणाच्याही दबावात काम करीत नाही. तात्पुरता राजकीय दबावात फिर्यादिला स्वप्नील धुळे कडून त्रास देण्यात आला होता. पण आज कायदेशीर मार्गाने न्याय मिळविणाऱ्या फिर्यादिचा दिवस कायद्यामुळेच उजाडला आहे. पोलीस अधिकारी असो वा आमदार असो त्यांच्या आजोबालाही कायदा त्यांची जागा दाखवून देते हे या प्रकरणातून सिद्ध झाले आहे. ज्या नेत्यांनी व पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपीला त्यांचे गुन्हेगारीत सहकार्य केले त्यांच्या थोबाडात आरोपींवर गुन्हे दाखल झाल्याने चांगलीच चपारक बसली आहे. न्याय हक्कासाठी कायदेशीर लढा दिल्यास आर्थिक व मानसिक त्रास जरूर होतो मात्र शेवटी सत्याचा विजय होऊन न्याय मिळाल्याचे समाधान फिर्यादीने व्यक्त केले.

लाचलूचपत विभागाने कोणताही विलंब न करता सूरज ठाकरे व सारंग दाभेकर यांनी स्वप्नील धुळे विरुद्ध दिलेल्या तक्रारीची तात्काळ चौकशी करून त्यांची सेवेतून हकालपट्टी करावी अशी मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here