इनोव्हेटिव्ह प्रशिक्षण केंद्रातुन निघणारा विद्यार्थीनी रुग्णसेवेत अग्रस्थानी राहावी – आ. किशोर जोरगेवार
इनोव्हेटिव्ह प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वार्षिक स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन
इनोव्हेटिव्ह प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन वैद्यकीय क्षेत्रात काम करण्याची आवड असेलल्या विद्यार्थांमधील कलागुणांची चाचपणी करुन त्यांना योग्य मार्गदर्शन केल्या जात आहे. येथुन प्रशिक्षण घेऊन विद्यार्थी परिचारिका म्हणुन वैद्यकीय क्षेत्रात काम करणार आहे. येथे शिक्षणासह होत असलेल्या संस्कारातुन निघणारी विद्यार्थिनी रुग्णसेवेत अग्रस्थानी राहवी असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
इनोव्हेटिव्ह प्रशिक्षण केंद्राच्या वतीने वार्षिक स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला परमेश्वर राजभिंदे, डॉ. विनोद नगराळे, डॉ. रिमा निनावे, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटीका वंदना हातगावकर, डॉ. हेमांगीनी बिश्वास, यंग चांदा ब्रिगेडच्या बंगाली समाज शहर संघटिका सविता दंडारे, प्रा श्याम हेडाऊ, विमल कातकर, आशा देशमुख आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि, शिक्षण आणि आरोग्य हे दोन विषय आमच्यासाठी महत्वाचे आहे. यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातुन या दोनही क्षेत्रात भरिव काम केल्या जात आहे. गरजु विद्यार्थांसाठी निशुल्क अभ्यास करता यावा या करिता आपण मतदार संघात 11 सुसज्ज अभ्यासिका तयार करण्याचा संकल्प केला आहे. यातील पाच अभ्यासकिकांच्या कामाला सुरवात झाली आहे. तर उर्वरित अभ्यासिकांचे काम प्रस्तावित आहे. तर नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिले पाहिजे या दिशेनेही आमचे प्रयत्न सुरु आहे. मतदार संघातील विविध भागात आपण नियमीत आरोग्य शिबीरे आयोजित करीत आहोत. या शिबिरांच्या माध्यमातुन नागरिकांची तपासणी केल्या जात असुन रुग्णांवर निशुल्क औषधोपचार केल्या जात असल्याचे ते यावेळी म्हणाले.
कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रावर मोठा ताण निर्माण झाला होता. त्यावेळी डॉक्टरांसह परिचारिकेचे महत्व लक्षात आले. यावेळी वैद्यकीय क्षेत्राचे सर्वात मोठे सहकार्य लाभले. त्याकाळी त्यांनी दिलेले योगदान समाज कधीही विसरणार नाही. इनोव्हेटिव्ह प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन वैद्यकीय क्षेत्रातील भावी परिचारिका घडविण्याचे काम केल्या जात आहे. हे एक सेवेचे माध्यम आहे. डॉक्टरांसह परिचारिकांचे काम जबाबदारीचे आहे. रुग्णांसाठी त्यांच्यामध्ये आपुलकीची भावना असली पाहिजे. परिचारिकांच्या माध्यमातून रुग्णांना स्नेहपूर्ण वागणूक मिळाली पाहिजे. या बाबतचे योग्य प्रशिक्षण इनोव्हेटिव्ह प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातुन भावी परिचारिकांना मिळावे आणि इथून तयार होऊन निघाणारी परिचारिका रुग्णांसाठी देवदूत ठरावी अशी अपेक्षाही यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला नर्सीगचे प्रशिक्षण घेणा-र्या विद्यार्थींनीसह प्रशिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.