घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र म्हणजे महाराष्ट्रातील सेवाभावींसाठी ऊर्जास्त्रोत!

0
1006

घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र म्हणजे महाराष्ट्रातील सेवाभावींसाठी ऊर्जास्त्रोत!

सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांची सेवा केंद्राला सदिच्छा भेट

सुप्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते तसेच नाम फाउंडेशनचे सहसंस्थापक मकरंद अनासपुरे यांनी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घुग्घुस येथील ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राला सदिच्छा भेट दिली.

याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे संचालक विवेक बोढे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची व शासकीय योजनांच्या माध्यमातून होणाऱ्या निःशुल्क सेवाकार्याची माहिती त्यांना दिली.

यावेळी अनासपुरे म्हणाले, की चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथे असणारं हे ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र म्हणजे महाराष्ट्रातील सर्वच सेवाभावींसाठी ऊर्जास्त्रोत आहे. हे महाराष्ट्रातील एकमेव सेवा केंद्र आहे. ज्याच्या माध्यमातून विविध सेवात्मक सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. गोरगरिबांच्या हाकेला ओ देऊन त्यांच्या चेहर्‍यावर समाधान फुलविण्याचे काम या माध्यमातून केले जाते, हे निश्चितचं प्रशंसनीय आहे.

श्री. देवरावजी भोंगळे, विवेक बोढे व याठिकाणी काम करणाऱ्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. तसेच मा. सुधीरभाऊंच्या मार्गदर्शनात या सेवा केंद्राकडून अशीच अवीरत सेवा घडत राहो, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी प्रयास सखी मंचच्या अध्यक्ष सौ. किरणताई बोढे, माजी जि.प. सभापती नितु चौधरी, माजी पं. स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, माजी सरपंच संतोष नुने, भाजपाचे सिनू इसारप, विनोद चौधरी, साजन गोहने, मधुकर मालेकर, संजय भोंगळे, बबलू सातपुते, सुरेंद्र जोगी, नीळकंठ नांदे, हेमराज बोंबले,विवेक तिवारी,शंकर सिद्धम,श्रीकांत सावे, वैशाली ढवस, सरिता इसारप, सारिका भोंगळे, सुनीता घिवे, सीमा पारखी,अमीना बेगम, सरस्वती पाटील, नाझीमा कुरेशी, वैष्णवी बोंबले, वृंदा कोंगरे, दुर्गा जुमनाके, वंदना मुळेवार, अर्चना लेंडे, ज्योती काळे, अनिता परचाके, चेतना कपारे, पुष्पा सोनेकर, छाया पिंपळशेंडे, ज्योती पाटील, सुकेशनी गुरु, शोभा चिंचोलकर, वैशाली गौरकार, माधुरी येलचलवार, जयश्री चुने, सुरेखा डाखरे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here