श्री. संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त सुनिल गेडाम शिक्षकच्या घरी महाप्रसादाचे आयोजन
दि.१३ फेब्रुवारी २०२३ सोमवार रोजी श्री. संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त रा.वणी येथील साईबाबा नगर शिक्षक सुनिल गेडाम यांचा घरी श्री.संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त त्यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.सामुहिक पुजा करण्यात आले.
शिक्षक सुनिल गेडाम भक्तांना सांगत होते, की शेगावनिवासी संत श्री गजानन महाराजांना श्री. दत्तगुरुंचे तिसरे रूप म्हणूनही ओळखलं जातं, अक्कलकोटनिवासी श्री. स्वामी समर्थ महाराज आणि शिर्डीचे साई बाबा ही श्री दत्तांची पहिली दोन रुपं म्हमून ओळखली जातात. श्री गजानन महाराजांचे सर्वप्रथम दर्शन शेगाव मध्ये १३ फेब्रुवारी १८७८ रोजी झाले होते, महारांजांच्या जन्माचा कुठलाही पुरावा नाही, म्हणूनच १३ फेब्रुवारी हा दिवस श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन म्हणून साजरा केला जातो. श्री संत गजानन महाराज परमज्ञानी, अध्यात्मिक, महान योगी आहेत. मानवतेला सदाचार संपन्न करून महाराजांनी आपला अवतार ८ सप्टेंबर १९१० ला समाधी घेऊन संपवला. मात्र त्याआधी दोन वर्षांपूर्वीच महाराजांनी समाधीचा दिवस आणि समाधीची जागा भक्तांना सांगितली होती. यावेळी सर्व भक्त व परिसरातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.