अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांची भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्यासोबत बैठक

0
624

अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांची भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्यासोबत बैठक

घुग्घुस येथील अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांची शनिवार ११ फेब्रुवारीला घटनास्थळाच्या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्यासोबत बैठक पार पडली.
याप्रसंगी बैठकी दरम्यान शासकीय घरपट्टे देऊन घर बांधून देण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच सोमवार, १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चंद्रपूर येथील नियोजन भावनात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत शासकीय घरपट्टे देऊन घर बांधून देण्यासाठी अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी यावेळी दिली. त्यामुळे अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांनी आम्ही भाजपा पाठीशी उभे राहू असा निर्धार व्यक्त केला.

घुग्घुस येथे अमराई वार्डात मागील वर्षी २६ ऑगस्ट रोजी भुस्खलन होऊन गजानन मडावी यांचे घर जमिनीत गेले होते. त्यामुळे येथील १६० कुटुंबियांना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून इतरत्र हलविण्यात आले होते.

येथील अमराई वार्ड धोकादायक स्थितीत असल्याने या वस्तीचे पुनर्वसन करण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांच्या उपस्थितीत यावर निर्णय घेण्यासाठी तत्कालिन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. बैठकीत आमदार प्रतिभा धानोरकर, वेकोलिचे महाप्रबंधक आभासचंद्र सिंग, घुग्घुस काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष राजू रेड्डी, काँग्रेसचे रोशन पचारे, पवन आगदारी, सय्यद अनवर, अलीम शेख, रोशन दंतलवार उपस्थित होते. बैठकीत सहा महिन्यांत शासकीय घरपट्टे देऊन घर बांधून दिले जाईल तोपर्यंत नागरिकांना घरभाडे देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु घरपट्टे व घरे बांधून दिली नाही.

भुस्खलनग्रस्त अमराई वार्डातील संतप्त महिलांनी घटनास्थळाच्या रस्त्यावर बसून मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात ठिय्या मांडला व काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची मागणी रेटून धरली होती.

काँग्रेसच्या नेत्यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरल्याने भुस्खलनग्रस्त अमराई वार्डातील महिलांनी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली व समस्या सोडविण्यासाठी चर्चा केली. यावेळी माजी सरपंच संतोष नुने, गणेश उईके, पवन नागपुरे व वार्डवासीय उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here