मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आरोग्य शिबिर व ५९ विविध धार्मिक ठिकाणी आरती, पूजा व प्रार्थनेचे आयोजन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील क्रिष्णा नगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता या आरोग्य शिबिराला सुरवात होणार आहे. तर ५९ विविध धर्मीय धार्मिक स्थळी आरती, पूजा व प्रार्थनेचे आयोजनही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्या गुरुवारी वाढदिवस आहे. त्यामुळे राज्यभरात विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूरातही आमदार किशोर जोरगेवार यांच्या मार्गदर्शनात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुल रोड वरील क्रिष्णा नगर दुर्गा माता मंदिराच्या पटांगणावर घेण्यात येणार आहे. या आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह कर्करोग, हृदयरोग, श्वसन रोग, अस्थी रोग, आदी रोगांवर तपासणी करण्यात येणार असून निशुक्ल औषाधोपचार करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ५९ वा वाढदिवस असल्यामुळे सकाळ पासूनच शहरातील ५९ विविध धर्मीय धार्मिक ठिकाणी आरती, पूजा व प्रार्थना केल्या जाणार आहे.