विश्वासू व निस्वार्थी भावनेचे प्रतिक असणारे जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकुन शैलेन्द्र धात्रक नाबाद ३७!
चंद्रपूर । किरण घाटे
विश्वासू व निस्वार्थी भावनेचे प्रतिक असणारे चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्तव्यदक्ष अव्वल कारकुऩ शैलेन्द्र धात्रक आज गुरुवार दि.१५आँक्टाेबरला वयाची ३६वर्ष पूर्ण करुन ३७वर्षात पदार्पण करीत आहे .महसुल विभागात धात्रक हे सन २००३मध्ये रुजू झाले बघता बघता त्यांना अवघ्या आठ वर्षात अव्वल कारकुन म्हणून पदाेन्नती मिळाली . चंद्रपूर जिल्ह्यातील महसुल विभागात अनेक कनिष्ठ व जेष्ठ लिपिक कार्यरत आहे .या सर्वांमध्ये आज शैलेन्द्र धात्रक लोकप्रिय व सुपरिचीत आहे. गत दाेन महिण्यापुर्वि महसुल कर्मचारी संघटनेची निवडणुक न हाेता सर्वांनुमते शैलेन्द्र धात्रक यांचेवर चंद्रपूर जिल्हा महसुल कर्मचारी संघटनेची (शाखा चंद्रपूर) अध्यक्षपदाची धुरा साेपविण्यांत आली .जिल्हाधिकारी कार्यालयातील आज त्यांचे कडे महत्वाचा (तलाठी आस्थापनाचा) टेबल आहे .अधिकारी व कर्मचारी यांचेशी नेहमीच त्यांचे मधुर व गाेड सबंध जुळलेले आहे . टेबल वरील वेळीच काम उरकविण्यात व हातावेगळे करण्यांत त्यांचा हातखंडा आहे एव्हढेच नाहीतर कर्मचारी वर्गात एक दिलदार मित्र म्हणून शैलेन्द्र धात्रक यांची आेळख आहे .आज त्यांचा वाढदिवस आहे .या दिवसाचे औचित्य साधुन अनेक त्यांचे चाहत्यांनी व मित्रांनी त्यांना फेसबूक , व्हाँटसअप , दुरध्वनी , भ्रमणध्वनी व वैयक्तिकरित्या भेटुन लाख माेलाचे शुभेच्छा व शुभकामना दिल्या आहे. तदवतचं महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचल ग्रुप ने देखिल धात्रक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान केल्या आहे.