राजुऱ्यात संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची 646 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
राजुरा – संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती राजुरा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. सदर जयंतीचे आयोजन संत रविदास चर्मकार फाउंडेशन राजुरा व संत रविदास महाराज उत्सव समिती राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. चौदाव्या शतकातील महान समाज क्रांतिकारी व सामाजिक समतेचे उद्धारकर्ते संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांच्या 646 व्या जयंती उत्सवाचे आयोजन 05 फरवरी 2023 रोज रविवारला छत्रपती शिवाजी महाराज संकुल येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले.
जयंती कार्यक्रमानिमित्त सामाजिक चळवळीची दिशा आणि दशा यावर संत रविदास बहुजन समाज सेवा मंडळाचे विसापूर येथील अध्यक्ष नवानंद खंडाळे यांनी प्रखर विचार व्यक्त केले. अनेकांनी या चळवळी बाबत आपले विचार व्यक्त केले. तसेच महापुरुषांचे विचारांचे अनुकरणाशिवाय सामाजिक हित शक्य नाही. असा संदेश कार्यक्रमातून उपस्थित मान्यवरांनी दिला.
जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पश्चिम विदर्भ राष्ट्रीय चर्मकार महासंघ संपर्कप्रमुख संभा वाघमारे तर उद्घाटक म्हणून नगरपरिषद राजुरा चे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे हे होते आणि त्यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात चर्मकार समाज बांधवांना जागा उपलब्ध करून देऊ व समाज मंदिर बांधण्याचे आश्वासन दिले. विशेष अतिथी म्हणून सामाजिक वनीकरण चंद्रपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी गजानन इंगळे, नगरपरिषद राजुरा रचना सहायक अभिनंदन काळे, प्रमुख पाहुणे म्हणून हरीश घोरे, प्रणय बचाशंकर, रमेश टिकले, नवानंद खंडाळे, मेघराज खंडाळे, लक्ष्मण तिखे, उद्धव शिवणकर, नानाजी नवले हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती मनोज सदाफळे यांनी तर आभार प्रदर्शन पुष्पकुमार मेंढे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज सदाफळे, अमोल नवले, रोशन बचाशंकर, मुरलीधर खंडाळे, निलेश पवार, सचिन लांडे, अनिल पवार, प्रवीण लिपटे, शुभम सदाफळे, योगेश सदाफळे, योगेश खंडाळे, शुभम भटवलकर, ओमदेव इंगोले, विजय इंगोले यांनी मोलाचे सहकार्य केले.