ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करा!
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेची मागणी ; उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर
चिमूर । विकास खोब्रागडे
ओबीसी समाज सर्व आरक्षणा पासून वंचित राहिला आहे. आतापर्यंत ओबीसीच्या तोंडाला पानी पुसन्याचे कामे झाली असून 2021 मधे होऊ घातलेल्या जनगणनाच्या फार्म मधे ओबीसीची जात व पोटजात दर्शविनारा कालम करा, असि मागणी महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा चंद्रपुर उत्तर ग्रामीण च्या वतीने मुख्यमंत्रयाना दिलेल्या पत्रात करण्यात आली. केंद्र सरकारच्या अख्त्यारित असलेले जनगणना आयुक्त विवेक जोशी यानी ओबीसी जनगणना जातिनिहाय फेंटाळल्यामुळे सम्पूर्ण ओबीसी सामाजामधे संतापाची लाट उसळल्याची बाब निवेदनात मांडन्यात आली आहे, हिमाचल प्रदेशमधे तेली सामाजाला मागास जातिमधे समाविष्ट करण्यात आले आहे, ही बाब केवळ हिमाचल प्रदेशपूर्ती मर्यादित न ठेवता तोच विषय सम्पूर्ण भारतात लागू करावा, देशातिल सर्व ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसीना 52% आरक्षण देण्यात यावे, राज्यातील ओबीसी जाती/पोट जाती मधील दुजाभाव बंद करावा व सर्व पोट जातिना मुख्य जातिमधे व ओबीसी मधे सामविष्ट करुण घ्यावे, क्रिमिलर ची अट रद्द करण्यात यावी, आदि मागण्याचां समावेश या मधे करण्यात आला, चिमुर येथील उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांचे मार्फ़त मुख्यमंत्रयाना निवेदन देण्यात आले, या वेळी, महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभेचे चंद्रपुर विभागीय अध्यक्ष संजय खाटीक, युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते, मूक बधिर विधालयचे मुख्याध्यापक रामदास कामडी, चन्द्रपुर उत्तर ग्रमीण जिल्हादयक्ष उमेश हींग, सचिव कवडू लोहकरे, रोशन जुमड़े, राकेश साठोने, आशीष बगलकर, विधि सातपुते उपस्तित होते.