क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रम विद्यार्थ्यांमधील कलागुण सादर करण्याचे माध्यम – आ. किशोर जोरगेवार
डॉ. आंबेडकर कला. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने युवा तरंग २०२३ क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन
महाविद्यालयीन शिक्षण हा पूढील आयुष्याचा पाया असतो. महाविद्यालयीन शिक्षणानंतरच विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळत असते. या वयात शिक्षणासह क्रीडा व सांस्कृतीक क्षेत्राकडेही वळण्याची मोठी संधी विद्यार्थ्यांपुढे असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्रिडा व सांस्कृतीक क्षेत्रातील कलागुण सादर करण्यासाठी महावीद्यालयाने मंच उपलब्ध करुन देण्याची गरज असून क्रिडा व सांस्कृतीक कार्यक्रम विद्यार्थ्यांमधील कलागुण सादर करण्याचे महत्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
स्व. इंदिरा गांधी प्रियदर्शनी सभागृहात डॉ. आंबेडकर कला. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने युवा तरंग २०२३ क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना संबोधीत करतांना ते बोलत होते. या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मेमोरिअल सोसायटी संस्थेचे सचिव वामनराव मोडक, उपाधाय्क्ष, अरुण घोटेकर, कुणाल घोटेकर, राहुल घोटेकर, प्राचार्य राजेश दहेगावकर, विलास काळे, संजय बेले, अनुताई दहेगावकर आदींची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले की, सध्या सर्वत्र शालेय व महाविद्यालयीन महोत्सवांचे आयोजने सुरु आहेत. हे महोत्सव गरजेचे आहेत. विद्यार्थ्यांनीही अशा आयोजनात सहभाग घेत आपल्यातील कलागुण सादर केले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये मैदानी खेळांची आवड निर्माण झाली पाहिजे. असे यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले. डॉ. आंबेडकर कला. वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी हा नेहमी शिक्षणासह क्रीडा आणि सांस्कृतीक क्षेत्रात अग्रस्थानी राहिला आहे. यात संस्थेच्या वतीने नियमीत आयोजीत होत असलेल्या क्रीडा व सांस्कृतीक महोत्सवांचा मोठा वाटा असल्याचेही यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले.
भारतरत्न डाॅ. बाबा साहेब आंबेडकर यांनी दिक्षा दिलेल्या दिक्षाभुमी परिसरात असलेल्या या महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षीत असा विद्यार्थी येथुन घडावा. केवळ शिक्षीत होऊन चालनार नाही तर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगीतल्या प्रमाणे शिका, संघटीत व्हा आणि समाजातील चुकीच्या गोष्टींविरोधात संघर्ष करण्याचीही आपली तयारी असली पाहिजे. येथील विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण देण्याचे काम संस्थेच्या वतीने केल्या जात आहे. लोकप्रतिनीधी म्हणुन या संस्थेला आवश्यक त्या गोष्टी उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने काम करत आहोत. येथील अभ्यासिकेसाठी आपण एक करोड रुपयांचा निधी संस्थेला उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतून येथे सर्व सोयी सुविधायुक्त अभ्यासिकेच्या कामाला लवकरच सुरवात होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. येथील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात पूढे जावे मी नेहमी त्यांच्या पाठीशी राहिल असे यावेळी बोलतांना ते म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकवर्ग व शिक्षकवृध्दांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.