वाघीण लढली…
ज्ञानेश्वर गायकर पाटील
अहमदनगर
संगमनेर
नाशिक पदवीधर निवडणूक मोठी मनोरंजक झाली, तांबे विरुद्ध पाटील अशीच लढत झाली.तांबे यांना
शंभर हून अधिक संघटना, भाजप , काँग्रेस, राष्ट्रवादी , अन् शिवसेना शिंदे गट, यांचा उघड अथवा छुप्या पद्धतीने पाठिंबा होता, व तसे चित्र प्रचार यंत्रणेत काम करत असल्याचे दिसत होते…. या उलट शिवसेना पुरस्कृत शुभांगी पाटील यांचे होते . एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला , की त्यांना कोणती ही राजकीय वारसा नाही साधी ग्रामपंचायत घरात कुणी लढवली नाही, आर्थिक परिस्थिती खूपच बेताची , पक्ष म्हणून शिवसेनेत नवीन , कार्यकर्ता बळ नाही, महा विकास आघाडी घटक पक्षांची मदत नाही तरी ही अश्या ह्या झुंजार महिलेने जी झुंज दिली ती नाशिक पदवीधर मतदार संघात नक्कीच वाखाण्या सारखी आहे. जे पराभूत होतात ,ते विजयी ही असतात असे म्हटले जाते, असाच प्रकार शुभांगी पाटील यांच्या बाबतीत म्हणावा लागेल. प्रचार दौऱ्यात त्यांची ओळख झाली, जिल्हा परिषद शाळा बाबत त्यांची कळकळ मी पाहिली, सरकार चे धोरण किती क्लिष्ट आहे याची ही माहिती मला त्यांच्या चर्चेतून मिळाली. विनाअनुदानित शाळा अन् शिक्षक , जुनी पेन्शन योजना बाबत त्यांची मते परखड होती. ती लढाई ते पुढे चालू ठेवतील, आज निवडणूक हरलेल्या शुभांगी पाटील उद्या आझाद मैदानात पुन्हा उतरतील. त्यांना शिवसेना पक्ष म्हणून एक मोठे मैदान ही आता मिळाले आहे. नाशिक पदवीधर मतदार संघात, नगर जिल्ह्यात सर्वात जास्त मतदार नोंदणी झाली होती.याचा फायदा तांबे यांना नक्कीच झाला. भाजप ने जी खेळी केली,ती त्यांच्या वर उलटली . भाजप ने शुभांगी पाटील यांना मैदानात भाजप म्हणून उतरवले असते तर ,शुभांगी पाटील दहा हजार मते ही मिळवू शकल्या नसत्या. भाजप ने तांबे यांना मतदानात मदत केली . तांबे हे तसे अपक्ष उमेदवार असले तरी ते सर्व पक्षीय उमेदवार होते हे, सत्य ही नाकारता येणार नाही. त्यांची तगडी प्रचार यंत्रणा होती. डॉक्टर तांबे यांची मोठी पुण्याई पाठीमागे होती .सर्व पक्षीय नेते ,नातेवाईक म्हणून पाठीमागे होते.शुभांगी पाटील यांच्या मागे यातील काहीच नव्हते. शिवसेना पक्ष प्रमुख यांनी ऐन वेळेस त्यांना पाठिंबा दिला. गिरीश महाजन यांनी जंग जंग प्रयत्न करून ही त्यांनी माघार घेतली नाही. या मागे भाजप ला कुणाचे प्रेम नव्हते, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला नामोहरम करण्याचा प्रयत्न होता. हे प्रयत्न काहीच कामाला आले नाही. जे राजकारण भाजप ने केले ,ते त्यांच्याच अंगावर आले. राज्यात भाजपला उमेदवार मिळत नाही, अशी प्रतिमा या पक्षाची झाली. पाच जागा पैकी एका जागेवर कसा बसा विजय मिळवता आला.शिंदे फडणवीस यांची कामगिरी राज्यात ढिसाळ आहे हे आता सिद्ध झाले.राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका म्हणूनच ते लांबणीवर टाकत आहे. इंडिया टीव्ही, सी वोटर यांचा सर्व्ह ही नुकताच आला आहे. महा विकास आघाडी ला बळ मिळावे असा तो सर्वे आहे, तो सर्व्ह खरा होत आहे, हे आजच्या निवडणुकीत दिसून आले. केंद्रीय तपास यंत्रणा यांचा वापर करून ब्लॅक मेल राजकारण सध्या राज्यात चालू आहे. भाजपने ब्लॅकमेल करून पाहिले खासदार ,आमदार गळाला लावले, त्यांची संख्या संपली मग पोर पळवणारी टोळी निर्माण केली, आता ते ही संपले म्हणून त्यांचे तळागाळातील कार्यकर्ते गळाला लावले जात आहेत, यात राज्य सरकारची यंत्रणा वापरत आहेत. मग कुणाची पतपेढी चौकशी कर, कुणाची बँक , कुणाचा कारखाना , तर कुणाला वयक्तिक चौकशी.. हा प्रकार आता सर्व सामान्य मतदाराला कळायला लागला आहे, म्हणूनच भाजप ची “वाट” मतदार लावत आहे. भाजपला पुढे प्रवाहात राहणे गरजेचे वाटत नाही? राज्यात भाजपला मोठा जनाधार शिवसेना या पक्ष्यामुळे होता, शिंदे गटाची जादू चालत नाही ,हे भाजपला मुंबई महा नगर पालिकेत दिसून येईल.मराठी मतदार जेव्हा एक होतो तेव्हा तो भले भल्यांची गोची निर्माण करतो. राज्यात शिंदे यांच्या पक्षाची अवस्था खूपच वाईट आहे . शिर्डी मतदार संघाचे खासदार किती मतांनी पराभूत होतील हे न सांगितले बरे. अशीच अवस्था सगळीकडे आहे. राज्य गुप्तचर विभाग यांचे या बाबत अहवाल ही आले असतील. जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणुकीत महा विकास आघाडी एक संघ लढली तर, नक्कीच एक ही जिल्हा परिषद भाजप कडे जाणार नाही. शिंदे गटाची अवस्था त्या हून वाईट होईल. राज्यात महा विकास आघाडीला बळ मिळत आहे. युवा वर्गाला काँग्रेस अन् राष्ट्रवादीने बळ दिले पाहिजे. महागाई ,बेरोजगारी हे मुद्दे मोठे आहेत. महा विकास आघाडीने या वर मोठ रान माजवले पाहिजे. आंदोलने केली पाहिजे .शेतकरी संघटना मजबूत केल्या पाहिजे . महिला गृहिणी यांना घर घरात जाऊन महागाई विरोधी प्रबोधन करून तोफ डागली पाहिजे. पण महा विकास आघाडी हे करेल असे वाटत नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता सहानभुती कडे वाटचाल करत आहे, त्याचाच परिणाम होता की, सर्व पक्ष एकी कडे तरी ही शुभांगी पाटील यांनी नाशिक पदवीधर मतदार संघात सुमारे चाळीस हजार मते मिळाली . या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्रात शिवसेना (U B T) पक्ष मजबूत झाला हे ही त्यांना कमी नसे….. सर्व विजयी उमेदवार यांना शुभेच्छा, तर पराभूत उमेदवारांना ,पुढील काळात अजून मेहनत करून विजयी व्हाल म्हणून शुभेच्छा…. #वाघीण लढली
ज्ञानेश्वर गायकर पाटील
dmgaykar@gmail.com