5 फेब्रुवारी रोजी अल्कोहोलिक्स अनानिमस राजुरा येथे 10 वा वर्धापनदिन तसेच मद्यपाश एक आजार या विषयावर जनजागृती सभा
राजुरा – अल्कोहोलिक ॲनॉनिमस म्हणजे अनामिक मद्यपी ही जगभर पसरलेली संस्था आहे, ही संस्था कुठल्याही राजकीय,धार्मिक अथवा सामाजिक तत्त्वांशी संबंधित नसून ज्यांची दारू पिणे ही समस्या बनली आहे व ज्यांना दारू सोडण्याची इच्छा आहे अशा व्यक्तीला मदत करते. या संस्थेद्वारे कुठलीही वर्गणी किंवा फी आकारली जात नाही. या संस्थेतील सभासदांचे एकमेव उद्दिष्ट म्हणजे स्वतः दारूपासून दूर राहणे व ज्यांची दारू सोडण्याची इच्छा आहे अशा मद्यपीडीतांना मदत करणे होय. दारू पिणे ही कसलीही लत वा आदत नसून ते एक आजार आहे, या आजारातून बरे झालेले अनेक सभासद आज आपले कौटुंबिक व सामाजिक जीवन खूप सुखी व आनंदाने जगत आहे.
या संस्थेचाच एक छोटासा भाग असलेल्या आशा समूह राजुरा यांचा 10 वर्धापन दिवस सोहळा येत्या 5 फेब्रुवारी रोज रविवारला वेळ सायंकाळी 6 ते 8 या दरम्यान श्री शिवाजी हायस्कूल शिवाजी नगर वार्ड राजुराच्या प्रांगणात काही प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व मद्य पीडित व त्यांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या आजाराबद्दल जाणून घ्यावे असे आवाहन आशा समूहाचा सर्व सभासदांद्वारे करण्यात येत आहे.