ग्रामीण कलावंतांच्या कलागुणांना संधी द्या-ठाणेदार गभणे
बहुजन विचार बहू.संस्था व चिमूर प्रेस मीडिया एकल नृत्य स्पर्धा
तालुका प्रतिनिधी/चिमूर
ग्रामीण भागातील विद्यार्थी व कलाकारामध्ये पारंपरिक व आधुनिक सुप्त कलागुण असतात.त्यांना अभिव्यक्त होण्याची संधी मिळत नाही.अशा कलावंतांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या कलागुणांना व्हावं देण्यासाठी आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण त्यांना त्यांच्या हक्काचे मंच उपलब्ध करून घ्यावे.असं प्रतिपादन चिमुरचे ठाणेदार मनोज गभणे यांनी केलं. ते बहुजन विचार बहुउद्देशीय संस्था व चिमूर प्रेस मीडिया फाउंडेशन द्वारे खडसंगी येथील बाजार मैदानात आयोजित एकल नृत्य स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात त्यांनी केलं.
या वेळी मंचावर अध्यक्ष स्थानी चिमुर प्रेस मीडिया फाऊंडेशन चिमुर चे अध्यक्ष पंकज मिश्रा,भिसी चे ठाणेदार प्रकाश राऊत,पो.उपनिरीक्षक सचीन जंगम,सरपंच प्रियांका कोलते,उपसरपंच संदीप भोसकर तर सत्कारमूर्ती पत्रकार विकास खोब्रागडे,प्राचार्य सदाशिव मेश्राम, वैद्यकीय अधिकारी श्रीकांत रणदिवे,पशुधन पर्यवेक्षक रवींद्र वाभीटकर, भीमज्योति संस्थेचे गौतम रामटेके आदी उपस्थित होते.या वेळी सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केलं.
या कार्यक्रमाच प्रस्थाविक प्रमोद राऊत,संचालन आशिष गजभिये तर आभार प्रश्नात मेश्राम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेस मीडिया चे शुभम बारसागडे,योगेश सहारे, संजय नागदेवते,रोशन जुमडे, सुनील हिंगणकार,सुनील कोसे, विनोद शर्मा,राजेंद्र जाधव,सारंग भीमटे,जगदीश पेंदाम आदि व बहुजण विचार बहू. संस्थेचे राहुल धारने, प्रतीक औतकर, राहुल तराळे, करन नागोसे,मयूर मेश्राम,धीरज शंभरकर,संदीप गजभिये,राहुल राऊत,अरविंद पाटील,कुणाल नन्नावरे,आदित्य बारेकर व रितेश जाधव यांनी परिश्रम घेतले.