नॅशनल कराटे स्पर्धेत फिट टू फाईट्स चंद्रपूरच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश
महात्मा गांधी विद्यालय जरीपटका नागपूर येथे दिनांक 28 व 29 जानेवारी 2023 ला इन्स्पिरेशन कप नॅशनल कराटे स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेत महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, केरला तथा आंध्र प्रदेश या आठ राज्यातून आलेल्या एकूण 500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळलेल्या जूनसेई शोतोकान कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र च्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले.
JSKA महाराष्ट्र कडून भाग घेतलेल्या फिट टू फाइट्स चंद्रपूर येथील खेळाडू मारिया हुसेन एक सुवर्णपदक एक कांस्य पदक, माहीम खान एक रजत पदक, अनन्या येऊनाते एक रजत पदक एक कांस्य पदक, हार्दिक सिंग दोन रजत पदक, भार्गव मेहता दोन सुवर्ण पदक, पूर्वा शिरोया एक रजत पथक, मुलींमध्ये ब्लॅक बेल्ट काता या प्रकारात चॅम्पियन ठरली आर्थिक संजय उपाध्ये तसेच मुलांमध्ये ब्लॅक बेल्ट काता चॅम्पियन द्वितीय क्रमांकावर राहिले आर्येश संजय उपाध्ये. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन फाईट गटात अंकुश राजकुमार मुळेवार यांनी चॅम्पियन ट्रॉफी व रोख बक्षीसाचे जिंकले. टीमकोच म्हणुन स्पर्धा स्थळी इमरान खान, शहबाझ शेख, निलेश गेडाम, साहिल खान, प्रवीण चीमुरकर यांचे सहयोग लाभले.
यशस्वी स्पर्धकांनी आपल्या यशाचे श्रेय फिट टू फाईट्स चे संचालक विनय बोढे, रवी मुक्के, प्रमुख प्रशिक्षक मुहाफिझ सिद्दीकी, नरेश थटाल, मनजीत मंडल यांना दिले.