मॅजिक बस संस्थेच्या वतीने केंद्रप्रमुखांची एक दिवसीय कार्यशाळा संपन्न
आवाळपूर :- मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा.श्री प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक निखिलेश चौधरी यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाउंडेशन कोरपना येथील शाळा मधील कोरपना तालुक्यात स्केल कार्यक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळा द्वारे जीवन कौशल्य विकास हा उपक्रम अविरतपणे राबविल्या जात आहे. स्केल कार्यक्रमाच्या माध्यमातून गटशिक्षण अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, BRC कर्मचारी आणि विषयतज्ञ इत्यादींची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.. कार्यशाळेला अध्यक्ष म्हणून मा. रुपेश कांबळे सर गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती कोरपना यांची उपस्थिती होती. प्रमूख पाहुणे म्हणून मा. सचिन मालवी सर यांची उपस्थिती होती तर उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. प्रशांत लोखंडे सर यांची उपस्थिती होती.. सर्वप्रथम मॅजिक बस संस्थेची स्थापना आणि ओडख प्रशांत लोखंडे यांनी करून दिली व कार्यक्रमा बाबत तालुका समन्वयक निखिलेश चौधरी यांनी सहभागीना माहिती दिली.खेळाच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य कशाप्रकारे शिकविल्या जाते त्याचे प्रातेक्षिक करून सर्वांना प्रत्येक्षात अनुभव देण्यात आला. कोरपना शिक्षण विभाच्या अधिकाऱ्यांनी मॅजिक बस संस्थेच्या कार्याची प्रशांश केली व उपक्रमाला शुभेच्छा दिल्या… कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा सहाय्यक अधिकारी मुकेश भोयर यांनी केले. हा कार्यक्रमाचा यशवितेसाठी शाळा साहाय्यक अधिकारी भूषण शेंडे, आशिष मेश्राम, मोहिनी इंगळे, प्रतीक्षा सहारे, मुकेश भोयर परिश्रम घेतले.