लेखनी महिला बहूउद्देशीय मंडळ बल्लारपूरतर्फे प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन
लेखणी महिला मंडळातर्फे संविधान सन्मान उपक्रम राबवून शहरातील वर्ग 8 वी, 9 वी व 10 वी च्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षा म. ज्योतिबा फुले उर्दू विद्यालय, टेकडी विभाग येथे घेण्यात आली.
तसेच शहरातील non working (घर सांभाळणाऱ्या स्त्रियांकरिता) भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. वैशि्ट्यपूर्ण म्हणजे भाषण हे लिहून न देता फक्त म्हनायचे होते व वेळ फक्त 3 मिनिटांची होती. उद्दिष्ट हेच की महिला व बालकांना संविधान विषयी माहिती मिळावी. महिलांना त्यांचे अधिकार माहिती मिळावी. सौ नीलम वाघमारे यांच्या नेतृत्वात ‘माझा संविधान माझा अभिमान’ कार्यक्रम घेण्यात आला.
भाषण स्पर्धेत प्रथम क्रमंक आयु. नेहा खैरकर, द्वितीय क्रमांक आयु. कुंजीता सेंगर, तृतीय क्रमांक आयु. सुनिता खैरकार व आयु. मोनिका खोब्रागडे यांना मिळाले.
विद्यार्थ्यांमध्ये वर्ग 8 वी मध्ये प्रथम क्रमांक मनिमाला शर्मा द्वितीय क्रमांक पूर्वा मनोज खोब्रागडे तृतीय क्रमांक यश भरणे व उत्तेजनार्थ प्रज्वल घडसे वर्ग 9 वी करिता प्रथम क्रमांक सोहन शेरकी व प्रकृति ढोरे व्दितीय क्रमांक प्रतीक्षा शेंडे व अदिती नगराळे तृतीय क्रमांक वजाहात खान वर्ग 10 वी करिता प्रथम क्रमांक प्रशस्ती ढोरे व्दितीय क्रमांक साहिल राम व तृतीय हर्षदा उमरे यांना मिळाले. लेखणी मंडळातर्फे म. ज्योतिबा फुले उर्दू विद्यायलायचे आभार मानले. तसेच डेकोरेशन भूत्ते यांचे ही आभार मानले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. किरण ढमने विकास अधिकारी LIC प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री. मनोहर माडेकर निवृत्त मुखयाध्यापक न प बल्लारपूर व आयू. प्रकृती पाटील निवृत्त मुखयाध्यापक बल्लारपूर, आयू. आशा धेंगळे शिक्षिका जेव्हेरी कन्या हायस्कूल, बल्लारपूर उपस्थित होते.
याप्रसंगी मंडळाच्या उपाध्यक्षा सौ सोनाली घडसे , सचिव सौ स्वाती मुन तसेच मंडळातील सदस्य सौ सीमा डंभारे , सौ नेहा घडसे, सौ अनुसया धोपटे , सौ विमल मेश्राम, सौ. छाया वाघमारे, सौ. ज्योति वाघमारे, सौ. मोनिका साखरे, सौ. माया पाटील, सौ. प्रियंका गावंडे, सौ. शिल्पा हुमने, सौ प्रतिभा चिकाटे, सौ. दीक्षा गायकवाड व असंख्य महिलांची उपस्थित होती.
सूत्र संचालन आयु. योगिता ढोरे व कु. प्रशस्ती ढोरे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. राणी शंभरकर यांनी केले.