पीक कर्ज वाटप नाकारणे, एम एस पी नुसार शेतमाल खरेदी न करणे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे!

0
494

पीक कर्ज वाटप नाकारणे, एम एस पी नुसार शेतमाल खरेदी न करणे व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे!

किसान युवा क्रांती संघटनेतर्फे तहसीलदार यांना सदर मागणीचे दिले निवेदन

अमोल राऊत

वरोरा । शेतकऱ्यांना विनाविलंब पीक कर्ज वाटप बाबत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी आदेश देऊन देखील बँका विविध अडचणी दाखवून शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारून त्यांना अडचणीत आणत आहेत. तरी शेतकऱ्यांना विना विलंब पीक कर्ज उपलब्ध करून देण्यास आपल्या परिसरातील सर्व बँकांना तातडीने आदेश देऊन शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे.

तसेच आपल्या परिसरातील बाजार समित्यांमध्ये व बाजार समित्या बाहेर व्यापारी शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या एम एस पी पेक्षा फारच कमी दराने शेत माल खरेदी करीत आहेत. या बाबत बाजार समित्या व व्यापारी यांना आपले स्तरावरून एम एस पी नुसार शेत माल खरेदी साठी सक्त आदेश देण्यात यावे.

त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे काही भागात झालेले नाहीत. तरी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या. सदर मागणीचे निवेदन तहसीलदार वरोरा यांना किसान युवा क्रांती संघटना तालुका वरोरा यांच्या वतीने देण्यात आले.

यावेळी किसान युवा क्रांती संघटना वरोराचे अध्यक्ष शुभम कोहपरे, वैभव देवतळे, अनिकेत भोयर, सुरज धोटे यांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here